वेनेजुएलावर कारवाई, तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेने खळबळ ! नास्त्रेदमसची युद्धाबाबतच्या भीषण भविष्यवाण्या चर्चेत

 


अमेरिकेची वेनेजुएलावर सैन्य कारवाई आणि यांच्या 2026 मधील युद्धविषयक भविष्यवाण्या पुन्हा चर्चेत आल्या असून; तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढत आहे.

नवीन वर्ष 2026 ची सुरुवात होताच आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिकेने वेनेजुएलावर केलेल्या मोठ्या सैन्य कारवाईमुळे संपूर्ण जगाचे लक्ष लॅटिन अमेरिकेकडे वेधले गेले आहे. 3 जानेवारीच्या रात्री अमेरिकन सैन्याने वेनेजुएलाची राजधानी काराकस येथे हवाई हल्ला केला. या कारवाईनंतर वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे जागतिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नव्या वर्षासाठी हे संकेत शुभ नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ता नास्त्रेदमस यांच्या 2026 संदर्भातील युद्धविषयक भविष्यवाण्या पुन्हा  चर्चेत आल्या आहेत. वर्ष सुरू होण्यापूर्वीच या भविष्यवाण्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. नास्त्रेदमस यांनी 2026 मध्ये जगाला हादरवणाऱ्या संघर्षांचा इशारा दिला असल्याचे अनेक अभ्यासक सांगतात.

नास्त्रेदमस यांच्या मते, 2026 मध्ये जागतिक स्तरावर असे वातावरण तयार होईल, जे तिसऱ्या महायुद्धाकडे जगाला ढकलू शकते. धर्म, राष्ट्रवाद आणि सत्तासंघर्ष यांमुळे हिंसा वाढेल आणि माणूसच माणसाचा शत्रू बनेल, असे संकेत त्यांच्या लेखनात आढळतात. अलीकडील काळातील रशिया-युक्रेन संघर्ष हे याचे उदाहरण म्हणून दिले जाते.

त्याचबरोबर नास्त्रेदमस यांनी ‘रात्रीच्या अंधारात मधमाश्यांच्या झुंडीप्रमाणे होणारा हल्ला’ असा उल्लेख केला आहे. तज्ज्ञांच्या मते, याचा अर्थ प्रत्यक्ष मधमाश्या नसून अत्यंत गुप्त आणि योजनाबद्ध पद्धतीने रात्री करण्यात येणाऱ्या सैन्य कारवाईकडे आहे. अमेरिकेची वेनेजुएलावर झालेली कारवाई या वर्णनाशी साधर्म्य दर्शवते, असा दावा केला जात आहे.

या भविष्यवाण्यांमध्ये सात महिन्यांपर्यंत चालणाऱ्या मोठ्या युद्धाचाही उल्लेख आहे. या काळात प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी होईल आणि दोन बलाढ्य जागतिक नेत्यांमध्ये थेट संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही बाजू आपल्या विजयाबाबत ठाम असल्याने संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो, असेही संकेत दिले जातात.

नास्त्रेदमस यांच्या लेखनात समुद्री मार्गांवर होणाऱ्या संघर्षाचा इशाराही देण्यात आला आहे. एका विशाल जहाजाच्या बुडण्याचा उल्लेख करत त्यांनी समुद्रात विनाशकारी युद्ध होण्याची शक्यता मांडली आहे. 

बंदरांवरील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन अन्नधान्याची टंचाई आणि महागाई वाढू शकते. या आर्थिक दबावामुळे एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा पतन होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

अमेरिका आणि वेनेजुएला यांच्यातील सध्याच्या घडामोडी आणि नास्त्रेदमस यांच्या शतकांपूर्वीच्या भविष्यवाण्यांमधील साधर्म्यामुळे 2026 हे वर्ष जगासाठी अत्यंत निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने