१५०० कोटींच्या फसवणूक रॅकेटचा भंडाफोड सोनू सूद आणि खली चौकशीत अडकले!

कानपूर : देशाला हादरवून टाकणाऱ्या तब्बल १५०० कोटींच्या आंतरराष्ट्रीय फसवणूक प्रकरणात नवीन धक्कादायक वळण समोर आले आहे. रॅकेटचा मास्टरमाइंड रवींद्रनाथ सोनी याच्या फर्जी नेटवर्कच्या प्रचारात सहभागी झाल्याच्या आरोपावरून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि सुप्रसिद्ध रेसलर द ग्रेट खली यांना कानपूर पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात आणि क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलिस तपासानुसार, सोनीने सात वर्षे १६ कंपन्यांच्या माध्यमातून देश-विदेशात गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून जबरदस्त फसवणूक केली. त्याची मुख्य कंपनी ‘ब्लूचिप कमर्शियल ब्रोकर’ २०१८ पासून कार्यरत होती, तर ब्लूचिप इन्व्हेस्टमेंट LLCसह १६ कंपन्यांमधून अर्थकारणाचा जाळ विस्तारलेला होता. ७०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना फसवले असून ९० टक्के पीडित भारतातील, तर नेपाळ, व्हिएतनाम, जपान आणि अमेरिकेसह इतर देशांतील गुंतवणूकदारही या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

तपासात उघड झाले की, उच्चभ्रू गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सोनीने दुबईतील बुर्ज खलिफाजवळ आलिशान ऑफिस उभे केले होते आणि भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. पीडितांच्या तक्रारीनंतर दुबई अधिकाऱ्यांनी त्याला देशाबाहेर जाण्यास मनाई केली होती. मात्र सोनीने रूप बदलून दुबईहून पळ काढत ओमानमार्गे भारतात प्रवेश केला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फसवणुकीचा व्याप वाढत असल्याने पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन काय आहे. अतिरिक्त DCP क्राईम अंजली विश्वकर्मा या SITच्या प्रमुख असतील. १६ कंपन्यांची आर्थिक उलाढाल, बँक व्यवहार, क्रिप्टो व्यवहार आणि सोनी व त्याच्या सहकाऱ्यांच्या खासगी आर्थिक तपशीलांचा मागोवा घेणे SITसमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

या उच्चस्तरीय तपासात सोनू सूद आणि द ग्रेट खली यांची भूमिका होती की अनवधानाने त्यांचा प्रचार वापरण्यात आला, याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील ४८ तासांत दोघांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.



--------







Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने