इंडस्ट्रीने 9 ते 6 कामाची संस्कृती स्वीकारली पाहिजे”
मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या 8 तासांच्या कामाच्या शिफ्टवरून सुरु असलेल्या वादाने वेग घेतला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने मातृत्वानंतर 8 तासांपेक्षा जास्त काम करण्यास नकार दिल्यानंतर हा विषय इंडस्ट्रीभर चर्चेचा ठरला होता. आता या वादावर साउथ आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने थेट प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या वक्तव्यामुळे चर्चेला नवा ट्विस्ट मिळाला आहे.
सध्या रश्मिका तिच्या आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता धीक्षित शेट्टीसोबत झळकणार असून 7 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाने सांगितले की, “मी खूप काम करते, पण मला वाटतं की सगळ्यांनी स्वतःसाठी योग्य असा बॅलन्स साधायला हवा. इंडस्ट्रीने ‘9 ते 6’ चं वेळापत्रक स्वीकारलं पाहिजे. कलाकार आणि तंत्रज्ञ दोघांनाही वैयक्तिक आयुष्याला वेळ मिळणं गरजेचं आहे.”
रश्मिकाच्या या विधानानंतर चाहत्यांनी तिचं मत समर्थन केलं असून सोशल मीडियावर #WorkLifeBalance आणि #RespectArtists हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे की, “महिला कलाकारांनी स्वतःसाठी आरोग्यदायी काम संस्कृतीची मागणी करणं ही वेळेची गरज आहे.”
दरम्यान, दीपिका पदुकोणनेही याच विषयावर एका मुलाखतीत मत मांडलं होतं. ती म्हणाली होती, “भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक पुरुष कलाकार वर्षानुवर्षं फक्त 8 तास काम करतात आणि त्याबद्दल कोणी प्रश्न विचारत नाही. मात्र, एखाद्या महिलेनं तेच केलं, तर त्यावर वाद निर्माण होतो.” दीपिकाने इंडस्ट्रीतील “ढोंगीपणावर” बोट ठेवत सांगितलं की, “आता वेळ आली आहे की फिल्म इंडस्ट्रीत योग्य व्यवस्थापन आणि स्ट्रक्चर आणायला हवं.”
रश्मिका मंदाना आणि दीपिका पदुकोण यांच्या या मतांनंतर चित्रपटसृष्टीतील कामाच्या तासांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. अनेक निर्माते आणि तंत्रज्ञ या दोन्ही अभिनेत्रींच्या मताशी सहमत असून इंडस्ट्रीमध्ये ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ निर्माण करण्याची गरज अधोरेखित करत आहेत.
दरम्यान, रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत एंगेज झाल्याची चर्चा आहे. एका व्हिडिओमध्ये ती एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल अधिकच वाढले आहे.
काम, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य या सर्वांचा समतोल साधत रश्मिका मंदाना आजच्या पिढीतील आत्मविश्वास आणि वास्तववादी दृष्टिकोनाचं प्रतीक बनली आहे.
