जाणून घ्या कधी आहे सुट्टी आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ
नवी दिल्ली | देशभरात दिवाळीचा जल्लोष दिसत असून या निमित्तानं विविध क्षेत्रांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारालाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) या देशातील प्रमुख स्टॉक एक्सचेंजेस चार दिवस बंद राहणार आहेत. मात्र गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे.
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त 21 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे.
पुढील दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला (बुधवार) दिवाळी बालिप्रतिपदेनिमित्त ट्रेडिंग होणार नाही.
त्यानंतर 25 ऑक्टोबर (शनिवार) आणि 26 ऑक्टोबर (रविवार) हे आठवड्याचे सुट्टीचे दिवस असल्यामुळे बाजार बंद असेल. यामुळे येत्या आठवड्यात फक्त तीन दिवस शेअर बाजार सुरू राहणार आहे.
दिवाळीच्या निमित्तानं एनएसई आणि बीएसईवर मुहूर्त ट्रेडिंगसाठी 21 ऑक्टोबर 2025 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना दुपारी 1.45 ते 2.45 वाजेपर्यंत ट्रेडिंग करण्याची संधी मिळणार आहे,
तर प्री-ओपन सेशन 1.30 ते 1.45 वाजेपर्यंत असेल.
मुहूर्त ट्रेडिंग भारतीय परंपरेत शुभ मानलं जातं.
गुंतवणुकीच्या माध्यमातून वर्षभर समृद्धी, यश आणि आर्थिक वृद्धी मिळावी अशा शुभेच्छांसह गुंतवणूकदार या दिवशी व्यवहार सुरू करतात.
गेल्या काही वर्षांचा डेटा पाहिला तर मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद होत असल्याचं दिसून आलं आहे. मुहूर्त ट्रेडिंगचा सेशन हे केवळ आर्थिक व्यवहाराचं नाही तर विश्वास आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. गुंतवणूकदार या शुभ मुहूर्तावर नव्या वर्षाची सुरुवात ट्रेडिंगमधून करतात.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) देखील
21 आणि 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी आणि बालिप्रतिपदेनिमित्त बंद राहणार आहे.
—