जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे शुभ मुहूर्त आणि उपाय
मुंबई : पंचपर्वाची सुरुवात झाली आहे. यावर्षी हा पंचपर्व परंपरेप्रमाणे पाच दिवसांचा नसून सहा दिवसांचा असेल. कारण दिवाळी आणि धनतेरसच्या दरम्यान २१ ऑक्टोबरला रिक्त तिथी येत असल्याने हा उत्सव एक दिवसांनी वाढणार आहे. धनतेरस, नरक चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज या पाच प्रमुख सणांसोबत यंदा एक अतिरिक्त दिवस लाभला आहे. हा कालावधी ग्रहशक्ती जागृत करणारा आणि शुभतेने भरलेला मानला जातो.
कार्तिक कृष्ण त्रयोदशी, म्हणजेच धनतेरसचा पवित्र दिवस. या दिवशी कुबेरदेव आणि धन्वंतरी भगवान यांची पूजा केली जाते. धनतेरसचा संबंध गुरू आणि शुक्र ग्रहांशी आहे. बृहस्पति आयुष्य व आरोग्याचे तर शुक्र धन आणि वैभवाचे कारक मानले जातात.
धनतेरसनंतर येणारा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी. हा दिवस यमराजाच्या पूजेचा मानला जातो. या दिवशी यमराजाच्या नावाने दीप लावल्यास अकाली मृत्यूचे भय दूर होते, असे मानले जाते.
पूजा मुहूर्त: सायंकाळी ५.५० नंतर कोणत्याही वेळी पूजा करता येईल. सूर्योदयाआधी तेल-उटन लावून स्नान करावे. घराच्या चारही कोपऱ्यात तिळाच्या तेलाचे दिवे लावल्यास शनी आणि केतु ग्रहांचे दोष शांत होतात.
कार्तिक अमावस्येच्या रात्रीची दिवाळी ही महालक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ असते. हा दिवस चंद्र आणि शुक्र ग्रहांच्या ऊर्जेशी संबंधित असल्याने समृद्धी आणि सौभाग्य देणारा असतो.
पूजा मुहूर्त: प्रदोषकालात, म्हणजे सायंकाळी ७.०८ ते रात्री ९.०३ या वेळेत लक्ष्मीपूजन करणे सर्वोत्तम ठरते.
तूप किंवा तेलाचे दिवे लावावेत, शंखनाद करावा आणि महालक्ष्मी-गणेश स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी श्रीयंत्राची स्थापना केल्यास घरात धन आणि सौभाग्याचा वास होतो.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. हा दिवस भगवान श्रीकृष्णाच्या लीलांना समर्पित आहे. श्रीकृष्णांनी ब्रजवासियांना इंद्राच्या कोपापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला, ही याच दिवसाशी संबंधित कथा आहे.
पूजा मुहूर्त: सकाळी ६.२६ ते ८.४२ या वेळेत गोवर्धन पूजन करावे. या दिवशी गाय सेवा, अन्नदान, आणि मिट्टीपासून गोवर्धन पर्वत बनवून पूजा करावी. असे केल्याने गुरू आणि शनी ग्रह सक्रिय होतात व यश-समृद्धी लाभते.
पंचपर्वाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा चंद्र आणि बुध ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी बहिणी भावाला ओवाळतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
पूजा मुहूर्त: दुपारी १.१३ ते ३.२८ या वेळेत शुभ काळ आहे. या दिवशी चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे, हिरव्या फळांचे आणि वस्त्रांचे दान करावे. भावाने बहिणीला दागिने किंवा वस्तू भेट दिल्यास शुभ फल मिळते. बहिणींनी रात्री चंद्रदर्शन करून आरती करावी.
या प्रकारे यंदाचा पंचपर्व सहा दिवसांचा असून प्रत्येक दिवस ग्रहशक्ती जागृत करणारा आणि जीवनात शुभत्व वाढविणारा आहे. योग्य मुहूर्तात केलेली पूजा, दीपदान, दान आणि सेवा या माध्यमातून धन, आरोग्य, आनंद आणि कौटुंबिक सौहार्द यांची प्राप्ती होते, असे धर्मशास्त्रकार सांगतात.
#पंचपर्व २०२५, #धनतेरस शुभ मुहूर्त, #नरक चतुर्दशी पूजा, #दिवाळी २०२५, #गोवर्धन पूजा वेळ, #भाई दूज तिलक, #दिवाळी उपाय, #महालक्ष्मी पूजा, #श्रीयंत्र स्थापना, #कुबेर पूजा, #ग्रहशांती उपाय, #हिंदू सण, #कार्तिक अमावस्या, #दीपोत्सव,