यवतमाळ येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यातील दुसऱ्या डिजिटल दिव्यांग सहायत्ता कक्ष तसेच दिव्यांग उन्नती संकेतस्थळाचे अनावरण जिल्हा परिषदेच्या सभागृहात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांचा हस्ते पार पडले.
याद्वारे दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्या ५% सेस दिव्यांग कल्याण निधीतून स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन,आटा चक्की,ई रिक्षा,शेतीविषयक अवजारे यासह इतर योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोडे यांच्यासह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.