महाराष्ट्र24 । मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि माजी क्रिडा राज्यमंत्री संजय देशमुखांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू असताना आज दि.२० ऑक्टोबर ला मातोश्रीवर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलं.
शिवसेनेकडून सलग चार वेळा विक्रमी मताने निवडून येणारे संजय राठोड हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नंतर राठोडांचा नंबर राज्यात लागतो.संजय राठोड सेनेत असताना तेच चालक-मालक होते.माजी मंत्री संजय देशमुख यांनी सेनेत प्रवेश केल्याचं राठोडांना दुःख आहेत.मात्र ते बोलून दाखवता येत नाही अशी प्रस्थितीत संजय राठोड यांची झाली आहेत.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सेनेला मोठे धक्के सहन करावं लागलं.बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज आणि माजी मंत्री संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची विराट जाहीर सभा दिग्रस-दारव्हा मतदारसंघात घेणार आहेत.यावेळी लाखोंच्या उपस्थितीत अनेक पदाधिकारी सेनेत प्रवेश करणार असून त्यांचे नियोजन करण्यात आले आहेत.
माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांचे राजकीय शत्रु म्हणुन माजी मंत्री संजय देशमुख कडे पाहिल्या जाते.मुनगिनवार विरोधात सेवेतून बंडखोरी करत दोन वेळा अपक्ष निवडणूक देशमुखांनी लढवली होती.त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांची मनधरणी माजी मंत्री देशमुख यांनी केली आणि त्यांच्या नेतृत्वात संजय देशमुखांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी म्हटलं की, "संकटाच्या काळात पक्षाला साथ देणारा प्रत्येक माणूस आमचा मित्र आहे वास्तविक मी स्वतः दोन वेळा समजत देशमुखांकडून पराभूत झालो त्यांचे दुःखही आज मनात आहे मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दुःखापेक्षा माझे दुःख लहान" असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response