महाराष्ट्र 24 आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या बदलीला स्थागिती मिळाल्याने आर्णी करानी सोमवारी रात्री मोठा जल्लोष केला.
ठाणेदार पितांबर जाधव यांची सात महिन्यात कोणतेही कारण नसताना जाधव यांची बदली करण्यात आली होती.त्या नंतर आर्णी मधील जनतेतून तीव्र रोष व्यक्त करीत बदली विरोधात शहर बंद ची हाक देण्यात आली.
ठाणेदार पितांबर जाधव यांनी सात महिन्यात आर्णी ला लागलेला कलंक पुसून काढल्याने ते अल्पवधी काळात नागरिकांच्या मनात हिरो बनले. बदली विरोधात आर्णी कर एकत्र आले जन आंदोलन उभारण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा त्यांची बदली रद्द केल्याची माहिती शहरात काळातच मोठा जल्लोष करण्यात आला.
