महाराष्ट्र24। मुंबई : दारिद्र्य वाढती महागाई,निराधारता,भूक,न परवडणारे आजार अशा अनेक समस्यांनी उद्ध्वस झालेल्या तमाम शोषित पिडींताचा आक्रोश जगा समोर मांडून महाराष्ट्राचे तख्थत हलविणारे वंचितांना न्याय मिळवून देणारे "उघडा डोळे, बघा नीट" हे 'बिद्र' राज्यातील घराघरात पोहचविणारे 'एबीपी माझा'चे अॅकर 'प्रसन्न जोशी' आता सामर्थ्य महाराष्ट्राचे बिद्र असलेल्या 'साम टिव्ही'च्या प्रेक्षकांना प्रसन्न करतील का अशी चर्चा सुरू आहे.
प्रसिद्ध अॅकर प्रसन्न जोशी हे सन २००७ साली मराठी न्यूज वृत्तवाहिनी स्टार माझा मधून सुरूवात केली. तद्नंतर स्टार माझा हे नाव बदलून एबीपी माझा असे नाव देण्यात आली.प्रसन्न जोशी हे सुरूवाती पासून एबीपी माझा सोबत राहीले आहे. मात्र अचानक एबीपी ला जय महाराष्ट्र करून 'साम टिव्ही' मध्ये दाखल झाल्याने एबीपी मधील उघड नाराजी बाहेर आली आहे.
"बऱ्याच दिवसांनी डिजीटल व्हिडीओ केलाय सांभाळून घ्या" असे ट्विटर वर मजकुर लिहून प्रसन्न जोशींनी भावनिक पोस्ट शेअर केल्याने चर्चेला उधान जात आहे. विशेष म्हणजे प्रसन्न जोशी यांनी लक्ष असतं माझं असे म्हणुन एबीपी माझा चिमटा घेतला आहे.'साम टिव्ही'च्या प्रेक्षकांना जोशी खरच प्रसन्न करतील का हे लवकरच स्पष्ट होईल.
मध्यंतरी प्रसन्न जोशी यांनी 'एबीपी माझा' ला जय महाराष्ट्र केला. एक वर्षा नंतर जोशी एबीपी माझा मध्ये दाखल झाले. त्यानंतर नम्रता वागळे आणि अभिजित करंडे यांची मोठी अडचण झाल्याने त्यांना एबीपी माझा ला सोड चिठ्ठी दिल्याची चर्चा सुरू आहे. 'माझा विशेष' या डिबेट शोचे ते अॅकरींग करित होते.