Breaking

Post Top Ad

बुधवार, २ जून, २०२१

शासकीय नोकरी | विविध विभागात एकूण १०४७५ पदांची भरती

Naukri Margadarshan


शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून सध्या विविध शासकीय विभागांमध्ये तब्बल १०४७५ पदांची महाभरती सुरु असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या नोकरभरती मध्ये प्रामुख्याने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये अप्रेन्टिस म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे.



दक्षिण रेल्वेने अप्रेन्टिस पदासाठी ३३७८ जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून ३० जून २०२१  पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर पश्चिम रेल्वेने ३५९१ अप्रेन्टिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहे.


त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२१ आहे. या भरतीसाठी आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. याशिवाय जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदे भरण्यात येत आहेत.


भारतीय वायू दलात काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. ती संधी देखील सध्या उपलब्ध असून पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर तसेच एनसीसी सी डिव्हिजन प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येतील.


भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र संकेतस्थळाचे सर्वर योग्य रीतीने काम करत नसल्याने दोन वेळा या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली.


आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरु असून १० जून २०२१ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या शिवाय नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन व वसई विरार महानगरपालिकेतही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.


या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यासाठी गुगलवर www.naukrimargadarshan.com असे सर्च करावे. तसेच नोकरभरतीची नियमित माहिती हवी असल्यास नोकरी मार्गदर्शन चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad