Breaking

Post Top Ad

मंगळवार, २९ जून, २०२१

आमदार संजय राठोड भटक्या विमुक्तांचे आधारस्तंभ

आमदार  संजय राठोड भटक्या विमुक्तांचे आधारस्तंभ


महाराष्ट्र24यवतमाळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्यांमध्ये संजयभाऊ राठोड हे एक प्रभावी लोकनेते, जनसेवक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे.एक सच्चा शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी रुजविलेल्या विचारांचे तंतोतंत पालन करत अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा विकास पुरुष म्हणून संजयभाऊ आपली कामे अविरतपणे करत आहेत. 

आमदार  संजय राठोड भटक्या विमुक्तांचे आधारस्तंभ

आमदार म्हणून सातत्याने चार टर्म मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणारे संजय भाऊ जनतेच्या हाकेला धावून जातात, कोणत्याही संकटात बळ देणारा आपला माणूस म्हणून संजय भाऊंची ओळख आहे. कोरोना महामारीच्या काळात तब्बल बारा वेळा चक्क कोरोना वार्डात जाऊन रुग्णांचे मनोधैर्य वाढावं यासाठी त्यांची भेट घेऊन थेट संवाद साधणारा हा जिल्ह्यातला एकमेव नेता म्हणावा लागेल. रुग्णांच्या सोयीसाठी आपल्या जनसंपर्क कार्यालयातून अन्नदान, किराणा, जीवनोपयोगी साहित्य, मास्क सॅनिटायझर,गरजेच्या वस्तू वाटप करणे एवढेच नव्हे तर ज्या वेळी ऑक्सिजन बेडची खरी गरज होती त्यावेळी स्वखर्चानं यवतमाळ, दिग्रस,दारव्हा,नेर येथील शासकीय रुग्णालयात अनेक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले संकटाच्या काळात जनतेसाठी धावून जाणारा जनसेवक म्हणून धडपडणारा नेता म्हणजे संजय भाऊ राठोड.


बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरागड हे नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. देशभरातील अकरा कोटीहून अधिक बंजारा समाजाला आपल्या काशीत आनंदानं -निष्ठेनं डोकं टेकवता यावं या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या पोहरागडाचा विकास करण्यासाठी काही काळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारून या जिल्ह्यातही विकासकामे झपाट्याने केली. पोहरागडाचा विकास करतांना सुरुवातीला पहिल्याच टप्प्यात त्यांनी शंभर कोटीचे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय उभे केले. ज्याचे काम आज प्रगतीपथावर आहे. शीख धर्माच्या पार्श्वभूमीवर अमृतसर सारखे विकसित पोहरागड व्हावे ही दृष्टी संजयभाऊंची आहे म्हणूनच नंगारा म्युझियमला लागून शंभर हेक्टर वरील वनजमिनीपैकी दहा हेक्‍टर क्षेत्राचे सुंदर व रमणीय असे बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी सुमारे एकशेपंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून घेऊन त्याचा कृती कार्यक्रम सुरू केला. 

आमदार  संजय राठोड भटक्या विमुक्तांचे आधारस्तंभ

लाखो भाविकांच्या सोयीसाठी चोहोबाजूने पोहरागडला  येण्या-यांची गैरसोय होवू नये यासाठी मजबूत कॉंक्रीट रस्ते तयार करून घेतले. भाविकाच्या सोयीसाठी व पोहरागडाच्या विकासासाठी प्रस्तावित आराखड्यातील सर्व कामे पूर्ण करण्याचा मानस ठेवणारा हा जनसेवक बंजारा समाजात एकमेव असेल.इतकेच नव्हे तर मूळच्या भटक्या विमुक्त 'अ व ब' या प्रवर्गातील सध्याचे अस्तित्वात असलेली साडेचार टक्के आरक्षणाची टक्केवारी अनुसूचित जमाती च्या टक्के बाधित न करता आदिवासी 'ब'वर्ग निर्माण करून आरक्षण  देण्यात यावे.या प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करून त्याप्रमाणे अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात यावी. नॉन- क्रिमिलियर ची जाचक अट रद्द करणे.  मुळ भटक्या-विमुक्त अ-व-ब या प्रवर्गासाठी स्वाधार योजनेच्या धर्तीवर समकक्ष योजना सुरु करण्यात यावी. तसेच बार्टी,सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर वसंतराव नाईक मानवी विकास व संशोधन संस्था अर्थात वनार्टी स्थापन करण्यात यावी. अशा भटक्या-विमुक्तांच्या अनेक मागण्यांसाठी संजय भाऊ राठोड आग्रही आहेत.


विकासापासून खितपत असलेल्या या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून बंजारा समाजाचे संघटन मजबूत करताहेत सोबतच भटक्या प्रवर्गाला एकसंघ बांधने आणि भटक्या-विमुक्तांची एक मोट बांधून या प्रवर्गावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी संघर्षाची मशाल हातात घेऊन संजय भाऊ राठोड महाराष्ट्रभर फिरत आहेत. सदयस्थितीत त्यांच्या महाराष्ट्र भराच्या या दौर्‍याने अनेक प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे. मी स्वतः महाराष्ट्र दौऱ्याच्या नियोजन समितीचा एक सदस्य या नात्याने त्यांची कार्यशैली जवळून पाहिली आहे. दुखी,कष्टाळू शेतकरी यांच्या प्रतीची तळमळ गरीब विद्यार्थ्यांनी शिकावे, त्यांने मोठे व्हावे. यासाठी गरजूंना अनेक वर्षापासून लाखो रुपयांची प्रतिवर्षी शिष्यवृत्ती वाटप करतात. विद्यार्थ्याने शिकून स्वतःचं करिअर उभं करावं. यासाठी त्यांची आर्थिक आणि मानसिक बळ देणारी त्यांची तळमळही मी जवळून पाहिली आहे.


मतदारसंघाचा,जिल्ह्याचा विकास झपाट्याने करणारा हा नेता जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता बंजारा,भटक्या,बहुजनांचा नेता विकासपुरुष म्हणून महाराष्ट्राभर प्रसिद्धीस पावतो आहे. हे अनेकांना चांगले दिसते नाही. केवळ मीडिया ट्रायलच्या भरवशावर विरोधकांनी घाणेरडे राजकारण करत एका बहुजन नेतृत्वाला संपविण्याचा प्रयत्न मागच्या काही दिवसात केला. पण म्हणतात ना "सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं" या उक्तीप्रमाणे येणाऱ्या संकटातून निश्चित ते उंच झेप घेतील याचा सर्वसामान्यांना विश्वास आहे आणि विशेष म्हणजे या प्रसंगाच्या निमित्ताने बंजारा,भटके बहुजन संजयभाऊंच्या पाठीशी अधिक ताकदीने उभे झाले आहे. जनतेच्या मनावर अधिराज्य करणा-या या लोकनेत्याला पक्षप्रमुखही न्याय देऊन भटक्या-विमुक्तांची सेवा करण्याची संधी देईल हा विश्वास, ही आशा भटके-विमुक्त बहुजनांना आहे. एक कुशल नेतृत्व, उत्तम नियोजक, प्रचंड कार्यक्षमता असलेला आक्रमक झुंजार नेता म्हणून संजय भाऊ राठोड यांच्या कडे भटके-विमुक्त समाज आशेने पाहतो.संजयभाऊ राठोड यांची कार्यशैली भटक्या विमुक्तांसाठीचा त्यांचा कृती-कार्यक्रम पाहिला तर संजयभाऊ राठोड हे खऱ्या अर्थाने विमुक्त-भटक्यांचे एकमेव आधारस्तंभ आहे असेच म्हणावे लागेल.

   प्रा.राजेश चव्हाण, यवतमाळ- ९४२३६२५५९३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad