महाराष्ट्र24 । यवतमाळ: राज्याचे माजी वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड हे गेल्या काही दिवसा पासून राज्यव्यापी दौरा करित आहे. या दरम्यान बंजारा समाजासह ओबीसी समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत आहे.
विरोधी पक्षांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या वर गंभीर आरोप केल्यानंतर संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तद्नंतर काही दिवसातच 'राठोड' यांनी मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन भेटी घेऊन, कोरोना प्रस्थिती बाबत उपाययोजना संदर्भात आढवा बैठक घेऊन समस्या निकाली काढल्या.
गंभीर आरोपामुळे आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरे' यांच्या कडे दिला. तब्बल वीस दिवसा नंतर म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काही तास आधी राजीनामा मुख्यमंत्री यांनी मंजूर देखील केला. दरम्यान राजीनामा मंजूर झाल्या नंतर आमदार संजय राठोड हे चार भींतीच्या आत न अडकता थेट मतदारसंघातील जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विदर्भात शिवसेनेची दमदार तोफ म्हणुन आमदार संजय राठोड यांची ओळख आहे. लोकप्रियच्या बाबतीत जेवढे संजय राठोड जिल्ह्यात आहेत, तेवढेच ते राज्यात देखील आहे. आमदार संजय राठोड यांचा वाढदिवस दि.३० जून ला आहे. अशात जिल्ह्यात दोन दिवसा आधी पासूनच वाढदिवसा निमित्त समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्या जात आहे.
यवतमाळ शहरात लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातून मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याने आमदार संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण सध्या जिल्ह्यासह राज्यात दुपारी चार वाजता नंतर कडक निर्बंध लागु करण्यात आले आहे. त्यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे अडचणी वाढणार का हे पाहणे गरजेचे आहे.

