Breaking

Post Top Ad

सोमवार, १० मे, २०२१

'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं'

'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं'
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी काका-पुतण्या संदर्भात चर्चा होत असते.निवडणूकी दरम्यान तर हा विषय हमखास चर्चेला येते.मात्र आज आपण वाचणार आहात काका-पुतण्याची वेगळी स्टोरी.

राज्याच्या राजकारणात काका सोबत राहून अनेक पुतणे मोठी झाली.राजकीय डावपेच शिकली.काकांच्या भरोष्यावर ओळख मिळाली मात्र वेळ आली तेव्हा काकांची साथ सोडल्याची घटना याच महाराष्ट्राच्या राजकारणात घडली.

राज्याच्या राजकारणात मात्र एक आगळीवेगळी ओळख आणि कामगिरी करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुतणे तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे नाव ठळक अक्षरात आज समोर येते.वसंतराव नाईक राजकारणात असताना सुधाकरराव नाईक हे त्यांच्या यवतमाळ जिल्ह्याच्या घडामोडी कडे लक्ष देत होते.जिल्हा परिषद अध्यक्ष पासून राजकीय वाटचाल सुरू केलेल्या सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल या पदापर्यंत मजल मारली.

मुख्यमंत्री म्हणुन सुधाकरराव नाईक यांनी जवाबदारी हाती घेतल्या नंतर सर्वात पहिले त्यांनी जलक्रांती बाबत स्पेशल विभाग उघडले तेव्हा पासून पाण्याबाबत जनजागृती सुरू झाली.मात्र १९९३ मध्ये मुंबईत जेव्हा दंगल झाली.तेव्हा सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि त्या दरम्यान त्यांनी अंडरवर्ल्डशी निगडीत असलेले डाॅन दाऊद इब्राहिम,अरूण गवळी,भाई ठाकुर आदींना कायद्याचा फटका देत मुंबईतील भाईगिरी कायमाची मोडून काढली.

त्यावेळी खुद बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नव्हता.अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहिर सभेत सुधाकरराव नाईक यांच्या धाडसीवृत्तीचा भरभरून कौतुक केल्याचे भाषण आजही यूटूब वर उपलब्ध आहे. वसंतराव नाईक हे जरी राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहीले असले तरी सुधाकरराव नाईक यांनी केवळ दोन वर्षाच्या काळात त्यांनी मुंबईतील 'भाईगिरी' नावाचा शब्द कायमाचा बाद केल्याने वसंतराव नाईक यांचे पुतणे म्हणुन ओळख असलेल्या सुधाकरराव नाईक यांनी आपल्या काकांचे नाव चमकविले एवढे मात्र खरे.

'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं'

राज्यात काका पुतण्याचा वाद काही नविन नाही.बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना 'राज ठाकरे' यांनी शिवसेना सोडून मनसे नावाचा पक्ष स्थापन केले.अनेक वेळा ठाकरे विरूद्ध ठाकरेंनी एकमेका विरोधात आरोप प्रचारोप केल्याचे राज्याने पाहिले आहे.

'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं'
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे वर जिवापाड प्रेम केलं.राजकारणाच बाळकडू दिले.मात्र गोपीनाथ मुंडेंना सोडून धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली.

'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं'

राज्यात दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक हे कायम एकत्र राहिले. अॅड.निलय नाईक यांनी माजी मंत्री मनोहराव नाईक यांच्या विरोधात बंड पुकारले आणि विधानसभा निवडणुकीत उभे राहीले निवडणूकीत पराभव झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी काका मनोहराव नाईक यांना सोडून भाजप कडून विधान परिषदेची आमदारकी पदारात पाडून घेतली.त्यामुळे काका पुतण्याचा वाद हा नाईकांच्या बंगल्याला देखील झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad