तालुक्यातील रामपुर नगर येथे राहणाऱ्या युवतीचा एकतर्फी प्रेमातुन चाकु व गुप्तीने खुन केल्याची खळबळ जनक घटना दि.१५ मे घडली आहे. खंडाळा पोलीसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले असुन मुलीचे शव पुसद उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे.
खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रामपुर नगर येथे राहणारी सुवर्णा अर्जुन चव्हाण वय २१ वर्षे असे खुन झालेल्या युवतीचे नाव आहे. रामपुर येथे राहणारी सुवर्णा चव्हाणचे वडील,आई,भाऊ बाहेरगावी गेले होते.हि संधी साधुन गावात राहणारा आरोपी युवक आकाश श्रीराम आडे वय २५ वर्षे याने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या घरात घुसुन युवतीच्या पोटात चाकु व गुप्तीने वार करून जखमी केले.
सदर घटना ही प्रेम प्रकरणातून घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे एकतर्फी प्रेमातून खून झाला की प्रेम प्रकरणातून हे आरोपीने जबाब दिल्या नंतर स्पष्ट होणार आहे.
जखमी झालेल्या युवती गंभीर झाल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. यातच युवतीचा जागीच मृत्यु झाला. युवतीला जिवाने मारल्याची माहिती वाऱ्या सारखी गावात पसरली आणि गावात राहणाऱ्यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर खंडाळा पोलीसांनी तात्काळ रामपुर गाव गाठले खुन केल्याप्रकरणी पंचनामा केला व युवतीचे शव पुसदच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. युवतीला मारणारा आरोपी आकाश आडे याला पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी विरोधात खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.