तात्कालीन पालकमंत्री संजय राठोड हे जिल्हातील असल्याने आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह ह्या दोघांनी कोरोना नियंत्रणात आणला होता.जवळपास तेरा महिन्यात पाचशे रूग्ण कोरोनामुळे मृत्यू झाले.मात्र आमदार संजय राठोड यांच्या वर एका प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला.
'तात्कालीन पालकमंत्र्यांच्या बैठकीत खासदार गायब'
माजी मंत्री संजय राठोड पालकमंत्री असताना एकाही आढावा बैठकीत 'खासदार भावना गवळी पाटील' उपस्थित राहत नव्हत्या.मात्र नवे पालकमंत्री आले तेव्हा पासून खासदार गवळी आवर्जून उपस्थित असतात.या आधी जिल्ह्यात नागरिकांच्या समस्या नव्हत्या का? आताच बहुतेक समस्या निर्माण झाल्या असेल म्हणुन खासदार भावना गवळी पाटील पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थितीत राहत असावे अशी चर्चा जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
माजी मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्या नंतर काही दिवसातच जिल्ह्यातील मुरबी आणि वांझोट राजकीय नेत्यांनी आपले तोंड वर करून कोरोना संकटात राजकारण सुरू केले.त्यामुळे जिल्हाधिकारी सिंह यांची कोणतीही चुक नसताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.सिंह यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणुन अमोल येडगे यांनी पदभार हाती घेतला तर संजय राठोड यांच्या जागी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन संदिपान भुमरे यांच्या कडे सूत्र हाती देण्यात आले.जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री दोन्ही नवेच असल्याने शासन व प्रशासनात तालमेल जुळून आलेला नाही त्यामुळे दिड महिन्यात जिल्ह्यात आता पर्यंत सहाशेच्या वर कोरोना रूग्णांना जीव गमवावा लागला.