काही महिन्यांपूर्वी एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांचा नांव जोडल्या गेले त्यामुळे राठोड यांनी स्वतःहून निपक्ष चौकाशी होण्याच्या अनुषंगाने मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.तद्नंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि समाजाच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी वसई येथून दि.५ एप्रिल ला दौऱ्याला सुरूवात केली.पालघर,मिरारोड-बोरिवली,गोराई,चारकोप,कांदिवली येथे राठोड यांचा दौरा यशस्वीपणे पार पडला होता.
'कोरोना रूग्णांसाठी संजय राठोड बनला देवदूत'
आरोप आणि त्या नंतर राजीनामा दिल्या नंतर आमदार संजय राठोड हे गप्प न बसता दिग्रस,दारव्हा-नेर या त्यांच्या मतदारसंघात दररोज नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेताय.एवढंच नव्हे तर ऑक्सिजन प्लांट दारव्हा येथे मंजूर करून आणले.विशेष म्हणजे ते कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहे.
माजी मंत्री आमदार संजय राठोड पुन्हा एकदा संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याने राजकारणात विविध चर्चेला तोंड फुटले आहे.विशेष म्हणजे राज्यात या निमित्ताने आमदार संजय राठोड हे त्यांचा स्वतःचा मोठा नेटवर्क उभारत असल्याची माहिती समोर आली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काही तास आधी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.त्यामुळे पुन्हा पावसाळी अधिवेशनाच्या आदी मंत्री पदांची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

