मीच दिल्ली,मीच केरळ,मीच हिंदुस्थान आहे;मरणही माझे भुईला कुंकवाचे दान आहे ! कलीम खान
शब्दरचना
विजय ढाले,कवी 9689854100
आर्णी,यवतमाळ: साहित्य क्षेत्रातल बहारदार भारदस्त व्यक्तीमत्व संपुर्ण भारतभर आपल्या वेगळ्या शैलिसाठी प्रसिद्ध असलेले कवी गज़लकार आदरनिय कलीम खान सर आज साहित्य क्षेत्राला पोरक करून गेलेत.अनेक अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलने असो की, विदर्भ साहित्य संमेलने असो. ते आपल्या विशिष्ट शैलीने आपली छाप रसिक श्रोत्यांवर सोडायचे.श्रृंगारते यारा कधी,अंगारते माझी गजल बर्फातल्या सुर्यासवे,अवतारते माझी गजल तैशी खरे तर नेहमी, ही शांततेने नांदते पन वेळ जर आलीच तर, एल्गारते माझी जगल.कलीम खान
साहित्य क्षेत्रात वावरतांना त्यांनी अनेक नवोदितांना आपल्या ज्ञानाचे अमृत दान केले. बी.ए.बी.एड., एल.एल.बी. सेवानिवृत्त प्राचार्य (ज्युनियर काॅलेज) कवी तथा व्याख्याता आणि विषेश हिंदी,मराठी,उर्दू, इंग्रजी,संस्कृत भाषेवर आपल प्रभुत्व गाजवत साहित्य क्षेत्रावर अधिराज्य केले.त्यांचा साहित्य क्षेत्राचा प्रवास थक्क करणारा आहे. कलीम खान हे प्राध्यापक म्हणुन अनेक पिढ्या घडवितांना नेहमी कठोर पावल उचलायचे शिस्तप्रिय पण तितकेच मृदु स्वभावाचे ते धनी होते.अनेक कार्यक्रमाना त्यानी आपल्या अभ्यासपुर्ण संचलनाने चार चाँद लावलेत.सुरेश भट आणि गजल गंधर्व, सुधाकर कदम यांचे सोबत सपुर्ण देशभर ते आपल्या विशिष्ट संचलन शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे.
सृजन बिंब द्वारा प्रकाशित झालेल्या गजल संग्रह 'मंज़र' चे त्यांनी उत्कृष्ट संपादन केले. आजपर्यंत त्यांच्या कलीमच्या कविता,कलीम के दोहे,व गजल कौमुदी या साहित्य संग्रहाचे प्रकाशन करून त्यांनी श्रोत्यांच्या संग्रहात आदरपुर्वक ठेवले.कलीम के दोहे हे त्यांची अफलातून व एक नाविण्यपुर्ण साहित्य निर्मिती आहे. मागिल महिन्यातच आमच्या एका छोटेखानी मैफिलित त्यांनी आपली मनशा बोलून दाखविली की 'विजू आता माझे आगामी *चांद की टहनियाँ(उर्दु गजल संग्रह),सुर्याच्या पारंब्या(मुक्त छंदातील मराठी कविता) कलीमच्या रुबाया, या तीन संग्रहाच आपल्याल एकदम थाटात प्रकाशन करायच आहे,आणि तेही आर्णीत.!'
परंतू आज अचानक अशी वावटूळ येऊन कानात निरोप सांगून गेली.की त्या तिच्या निरोपावर खरच विश्वास बसने कठीण झाले.मृत्यु हा अटळ आहे.त्याने पृथ्वी तलावरील कोणत्याही जीवाला सोडले नाही.त्या विधात्याने त्याची प्रिय वास्तु पुन्हा आपल्या महालात नेली.आम्ही कोण त्याला अडवणारे.जरी खाणा-खुणा इथल्या,कधी पुसनारही नाही ; मनाची ती जुनी वस्ती,पुन्हा वसणारही नाही !
अभंगाचेच डोहाळे, तुला इंद्रायणी कांगे;आता दिंडीत ह्या खोट्या, तुका असणारही नाही ! कलीम खान
