श्री क्षेत्र कपिलधार येथे बुधवारी होणार गौरव समारंभ
छत्रपती संभाजीनगर : शिवा – अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केला जाणारा राज्यव्यापी मेळावा आणि ‘शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार’ सोहळा यंदा ५ नोव्हेंबर २०२५ रोजी बुधवारी श्री क्षेत्र कपिलधार, ता. जि. बीड येथे दुपारी ४.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांना राष्ट्रीय स्तरावर गौरविण्याची परंपरा यावर्षी ३० व्या वर्षात पदार्पण करत आहे. सन २००२ पासून सुरु झालेल्या या पुरस्कार सोहळ्याने गेल्या पंचवीस वर्षांत राज्यासह देशभरातील अनेक मान्यवरांचा सन्मान केला आहे.
या वर्षी होणाऱ्या ३० व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, अतुल सावे, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. यासाठी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतअप्पा शेटे आणि आयोजक अभयराव कल्लावार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
वीरमठ संस्थानचे मठाधिपती आदरणीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना शिवा संघटनेच्या वतीने ‘राष्ट्रसंत’ ही पदवी देण्यात आली आहे. सन २००७ मध्ये शिवाजी पार्क, मुंबई येथे झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात ही पदवी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या हस्ते बहाल करण्यात आली होती. आजही देशभर त्यांचा ‘राष्ट्रसंत’ म्हणून सन्मानाने उल्लेख केला जातो.शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट शिव : कथाकार पुरस्कार
श्री भ. प. कुमारसागर सांभय्या स्वामी, लोहारा, जि. धाराशिव. शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट शिव : किर्तनकार पुरस्कार - श्री भ. प. जगन्नाथ पांडुरंग क्षिरसागर, देवळाली, जि. धाराशिव. श्री भ. प. विश्वनाथ सदाशिव स्वामी पेनुरकर, पेनुर, ता. लोहा, जि. नांदेडशिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट गायक-वादक पुरस्काश्री मारोती शंकरअप्पा शिवशेट्टे, छत्रपती संभाजीनगर.
श्री खंडेराव राधाकिसन बंडगर, शेवाळा, ता. देगलुर, जि. नांदेड. श्री कपिल गजानन भालके, जामगा शिवनी, ता. लोहा. अखंड शिवनाम सप्ताह कमिटी पुरस्काअखंड शिवनाम सप्ताह कमिटी, चापोली (जि. लातूर) — श्री रमाकांत शिवराज स्वामी व श्री वसंत माणिकराव होनराव. उत्कृष्ट भजनी मंडळ पुरस्कार
श्री गुरु तोटलिंग स्वामी बाल भजनी मंडळ, कळमनुरी, जि. हिंगोली. वीरशैव भजनी मंडळ, नागलगाव, ता. उदगीर, जि. लातूर.शिवा संघटना तालुका शाखा – बुलढाणा (श्री सुनिल विश्वनाथ बेलपत्रे. उत्कृष्ट शहर शाखा पुरस्कारशिवा संघटना शहर शाख – लातूर (श्री शिवहार बिराजदार, श्री श्रीनिवास मेनकुदळे).उत्कृष्ट गाव शाखा पुरस्कार
सावरगाव, ता. लोहा (श्री नवनाथ दगडगावे, श्री उमाकांत कारामुंगे). वार्जरवाडा, ता. जळकोट (श्री कपिल टाले, श्री राहुल शिवनगे).पानभोसी, ता. कंधार (श्री विश्वनाथ भोसीकर, श्री बाबुराव डोम, श्री शेख बाबुसाब कासिमसाब).उत्कृष्ट सोशल मीडिया कार्यकर्ता पुरस्कारश्री दत्तात्रय प्रकाश पाटील, मंडगी, जि. नांदेड.श्री जनार्दन प्रल्हादराव खाकरे, परभणी.
श्री सुरेशअप्पा घळे, वाशिमश्री विरोचन प्रल्हाद तोटकर, गुडसुर, जि. लातूर.उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री विश्वनाथ गोविंदराव होळगे, दापसेड, जि. नांदेड. श्री मोहम्मद सिकंदर मोहम्मद यूसुफ, नांदेड, संपादक श्री शिवाजीराव रामराव गायकवाडउत्कृष्ट धार्मिक संस्था पुरस्कार शिवा-स्वयंभू नंदिकेश्वर महादेव मंदिर व अनुभव चॅरिटेबल ट्रस्ट, तुकाई टेकडी, हडपसर, पुणे. उत्कृष्ट सेवाधारी संस्था पुरस्कार
ड्रीम फाउंडेशन व महात्मा बसवेश्वर करिअर अकॅडमी, सोलापूर (संस्थापक काशीनाथ गुरुशांत भातगुणकी).या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याद्वारे वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत असल्याचे प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. “संघटनेचा उद्देश समाजातील सेवाभावी, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्य ओळखून त्यांचा गौरव करणे आहे,” असे ते म्हणाले.
प्रा. मनोहर धोंडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, शिवा संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली अभयराव कल्लावार, आणि उमाकांतअप्पा शेटे, यांनी हे पुरस्कार जाहीर केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
—
