Breaking

Post Top Ad

मंगळवार, २३ मार्च, २०२१

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कारागृहातील समस्यांचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कारागृहातील समस्यांचा आढावा
यवतमाळ : जिल्हा कारागृह येथे अभिविक्षीक मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कारागृह व परिसरातील सोईसुविधा तसेच कर्मचा-यांच्या निवास व्यवस्थेच्या प्रश्नांसंदर्भात आढावा घेतला.बैठकीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोईनुद्दिन, मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम. आर. ए. शेख, कारागृह अधिक्षक किर्ती चिंतामणी, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्हा कारागृहामध्ये सीसीटीव्ही सर्व्हर रुम बांधकाम करण्याचे काम प्रलंबित आहे. यासाठी निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून अद्यापही काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे सदर काम येत्या आठ दिवसांत त्रृटीसह पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. जिल्हा कारागृहामध्ये पोलिस व तुरुंग विभागाच्या आस्थापनेमधील पायाभुत सुविधा पुरविणे, संनिरीक्षण यंत्रणा उभारणे व इतर उपयुक्त तंत्रज्ञान पुरविणे या योजनेतून विविध बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 12 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यावरसुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या कामाला सुरुवात करून सदर काम ठराविक कालावधीच्या आत पूर्ण करावे.


कारागृहामध्ये बंदिस्त महिला कैद्यांसोबत असलेल्या लहान मुलांकरीता अंगणवाडी सुरू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचाराकरीता दाखल कैद्यांकरीता स्वतंत्र प्रिझन सुरू करण्याच्या दृष्टीने अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करण्यात येईल. कारागृहामधील बंद्यांना कोर्टपेशी तसेच शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याकरीता तसेच तात्पुरत्या कारागृहामधील बंद्यांच्या स्वॅब तपासणीकरीता पोलिस पथकाच्या मागणीप्रमाणे  वाहन पुरवठा करण्याच्या सुचना त्यांनी पोलिस विभागाला दिल्या. कारागृहामधील बंदिस्त कैद्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यायामाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत  जिल्हा कारागृहामध्ये ग्रीन जीम सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. जी. कचरे, उपअभियंता आर.एम. क्षीरसागर, कारागृह रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भानुप्रिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad