Breaking

Post Top Ad

रविवार, २१ मार्च, २०२१

जिल्ह्यात कोरोनाचे १४ बळी

जिल्ह्यात कोरोनाचे १४ बळी
यवतमाळ : रविवारी २४ तासात जिल्ह्यात १४ मृत्युसह ३८२ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४३० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


रविवारी एकूण ५०२० रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३८२ जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर ४६३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०३६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४५९३ झाली आहे. रविवारी २४ तासात ४३० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २१९९७ आहे. तर जिल्ह्यात एकूण ५६० मृत्युची नोंद आहे.


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ७२, ७९, ८०, ४५, ५०, ५८, ८३ वर्षीय पुरुष आणि ६३ वर्षीय महिला, पुसद येथील ८५ वर्षीय महिला, महागाव येथील ७८ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ४० वर्षीय महिला, केळापुर तालुक्यातील २६ वर्षीय महिला आणि माहुर (जि. नांदेड) येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझिटीव्ह आलेल्या ३८२ जणांमध्ये २६७ पुरुष आणि ११५ महिला आहेत. यात यवतमाळातील १८४, पुसद ४८, दिग्रस ४७, वणी ३४, उमरखेड़ १७, कळंब १४, महागाव १०, दारव्हा ८, पांढरकवडा ६, नेर ४, घाटंजी ४, झरी २, आर्णी १, मारेगाव १, रालेगाव १ आणि १ इतर शहरातील रुग्ण आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad