Breaking

Post Top Ad

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

'जिल्हाधिकारी रात्री रस्त्यावर उतरतात तेव्हा.....'

'जिल्हाधिकारी रात्री रस्त्यावर उतरतात तेव्हा.....'
यवतमाळ: जिल्ह्यावर जेव्हा जेव्हा संकट आला तेव्हा तेव्हा जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह सर्वात पुढे नागरिकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले आहे हे शिवजयंतीच्या रात्री म्हणजे दि.१९ फेब्रुवारी ला यवतमाळ शहरात वाघा सारखे नव्हे तर 'सिंहा' सारखे फिरून आढावा घेणारे जिल्हाधिकारी सिंह च जिल्ह्यात गेल्या काही दिवसा पासून कोरोनाचे रूग्णांना मध्ये मोठी वाढ होत आहे.त्यातच कोरोना बदल अफवा पसरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा प्रस्थितीत नागरिकांना धीर देण्याच्या दृष्टीने तसेच रात्री दरम्यान सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून जनतेत जावून कोरोना विषयी जनजागृती करण्याची धाडस यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारच्या रात्री दाखवल्याचे प्रत्यक्ष यवतमाळ करांनी अनुभवले.

'जिल्हाधिकारी रात्री रस्त्यावर उतरतात तेव्हा.....'
'जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढू नये' 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूगाणांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सिंह नागरिकांमध्ये जावून कोरोना संदर्भात जनजागृती करित असून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आवाहन ते करित आहे.


यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी 'कोरोना'च्या संकटातही जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना मदत करण्यासाठी जिल्ह्यात 'मिशन उभारी' अभियान राबून शेतकरी कुटूंबीया मोठा धीर दिला आहे.देशात अथवा जिल्ह्यात कोरोनाचे संकट नसते तर जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्ह्याचा चित्र चकाचक करता आले असते.तरी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना मिशन उभारी माध्यमातून दिलासा दिला ही बाब शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची आहे.

'जिल्हाधिकारी रात्री रस्त्यावर उतरतात तेव्हा.....'
जिल्हा दंडधिकारी असल्या नंतरही पदाचा कुठेही गर्व न बाळगता थेट नागरिकांमध्ये जावून संवाद साधणारा किंबहुना माणसांच्या जंगलातील 'सिंह' म्हणजे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह हे आहेत. लोकसेवत अनेक अधिकारी आहेत.मात्र यवतमाळ ला मिळालेल्या जिल्हाधिकाऱ्यांची यांची काम करणायाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे हे जिल्ह्यातील नागरिकांना त्यांचा अनुभव गेल्या वर्षभरात आला आहे.

'जिल्हाधिकारी रात्री रस्त्यावर उतरतात तेव्हा.....'
संचारबंदीचा जिल्हाधिकारी सिंह यांनी घेतला आढावा

गुरूवारी रात्री पासून जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी प्रत्यक्ष पणे शहरातील विविध चौकात फिरून संचारबंदीचा आढावा घेतला.दरम्यान विना मास्क असलेल्या नागरिकांना मास्क बदल महत्व पटवून देत 'मास्क' वापरा अन्यथा कारवाई ला समोर जा असे सुद्धा सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य नागरिक सुद्धा जिल्हाधिकारी सिंह यांना कामा निमित्त भेट घेण्यासाठी किंवा विविध कामा संदर्भात निवेदन देण्यास गेल्या नंतर हा माणुस थेट उभा राहून त्यांचे निवेदन घेतोय.दररोज कोणत्याना कोणत्या वर्तमान पत्रातून निवेदन देतांना समोरील अधिकारी हा बसूनच निवेदन घेतो असे चित्र पहायला मिळते मात्र जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेल्या नंतर जिल्हाधिकारी सिंह हे उभे राहून निवेदन स्विकारता त्यामुळे जिल्हाधिकारी सिंह अल्पवधी काळात जिल्ह्यातील नागरिकांच्या मनावर राज करित आहे हे त्यांच्या वाढदिवसा निमित्त दिसून आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad