यवतमाळ: कोरोना सध्या झपाट्याने वाढत असल्याने यवतमाळ शहरातील चार प्रभाग आज प्रशासनाने सील केल्याने शहर आणि जिल्हा पुन्हा लाॅकडाऊन च्या दिशेने वाटचाल करित असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कोरोना रूगाणांची संख्येत मोठी वाढ होत आहे.त्यातच यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील प्रभाग क्रमांक १८,१९,२७ आणि २८ सील केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे नागरिकांनी जीव धोक्यात न घालता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.
