मोदी सरकारचा केला निषेध
पेट्रोल व डिझेल दरवाढी मुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.नुकत्याच झालेल्या बजेट मध्ये अर्थमंत्री निर्मला निर्मला सितारामन ह्यांनी गोरगरीब जनतेचा विश्वासघात केला.केंद्रशासनाच्या चुकीच्या धोरणाने पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस महागत चालला आहे.ह्या दरवाढीला केंद्रशासनाला जबाबदार धरून सामान्य जनतेच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या जाचक दरवाढी विरोधात शिवसेनेने निषेध आंदोलन केले.स्थानिक तहसील ऑफिस ते दत्त चौक दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना सामान्य जनतेच्या पाठीशी
शिवसेना पक्ष हा सामान्य जमतेच्या व्यथा जाणणारा पक्ष असून सामान्य जनतेची गळचेपी झाल्यास शिवसेना कधीही रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहणार नाही.2014 साली मोदी सरकार येण्याच्या आधी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या असतांना पेट्रोल डिझेल चे भाव वाढले असा एकांततांडव करणारे भाजप पदाधिकारी आज केंद्रात मंत्री आहेत.आज आंतरराष्ट्रीय बाजारात ह्या किमती निम्यापेक्षा कमी झाल्या असतांना सुद्धा भरमसाठ टॅक्सेस लावून भाववाढ होत असताना ह्याच मंत्र्यांनी चुप्पी साधली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांच्या कथनी आणि करणी मधील फरक ह्या वरून दिसून येतो असे शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे ह्या प्रसंगी म्हणाले.
ह्या मोर्चामध्ये केंद्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.मोर्चाचा समारोप स्थानिक दत्त चौकात झाला.ह्या प्रसंगी बोलतांना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी बोलतांना मोदी सरकार हे सामान्य जनतेच्या विरोधात असल्याने येत्या काळात हे सरकार उलथवून टाकावे तसेच माता भगिनींनी सुद्धा उज्वला योजनेत घरोघरी गॅस देऊन आता घरगुती गॅसचे भाव वाढवणाऱ्या सरकार विरोधात रस्त्यावर यावे व मोदी सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी असे आवाहन केले.