Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०२१

जिल्हाधिकाऱ्यांचा जि.प.अधिकाऱ्यांकडून कौतुक

जिल्हाधिकाऱ्यांचा जि.प.अधिकाऱ्यांकडून कौतुक

जिल्हा परिषद मधील सर्वच विभाग अधिकाऱ्यांनी अचानक जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून भेट घेतली.दरम्यान सर्वच अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा कौतुक केले.कौतुक करण्यामागील कारण शोधली असता नुकताच जिल्हा नियोजन समितीची काल अर्थात दि.४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.'ती बैठक' अतिशय चांगली झाल्याचे म्हणणे जिल्हा परिषदेतील कौतुक करणाऱ्यां अधिकाऱ्यांचे आहे.


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी निधी परत गेला तर संबधित विभाग प्रमुखाला जाब विचारणार असल्याचा दम बैठकीत दिला.त्यातच गुरूवारी घाटंजी पंचायत समिती मधील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डाॅ.महेश मनवर आणि डाॅ.भूषण मसराम यांनी प्लस पोलीओ ऐवजी सॅनिटाझर १२ मुलांना दिल्याने यांची दखल खुद बाल हक्क आयोगाने घेतली त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.कारवाई आणि निधी परत गेला तर संबधित विभाग प्रमुखाला जाब विचारणार हे दोन विषयामुळे सर्वच अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे.त्याच अनुषंगाने बहुतेक जिल्हा परिषद मधील सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सिंह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा जि.प.अधिकाऱ्यांकडून कौतुक

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी बनला गळ्यातील ताईत

जिल्हाधिकाऱ्यांचा जि.प.अधिकाऱ्यांकडून कौतुक
जिल्हाचे तरूण तथा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह हे गेल्या एक वर्षा पासून जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्या संदर्भात योग्य पद्धतीने पाऊल उचलत आहे.कोरोना चा काळात देखील जिल्हाधिकारी हे स्वतः रात्र-बे रात्र सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून शहरात फेरफटका मारून शहरासह जिल्ह्यातील प्रस्थितीत जाणुन घेतली.विशेषतः शेतकऱ्यांसाठी 'मिशन उभारी' अभियान सुरू करून हजारो शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत लाभ मिळवून दिला.त्यामुळे जिल्हाधिकारी सिंह हे जिल्ह्यातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले याचा दाखला कोणालाही देण्याची गरज नाही.त्यातच महसूल विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी असतील किंवा इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची समस्या सुध्दा तेवढ्याच ताकतीने सोडवत असल्याने आता जिल्हाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनावर राज करित असल्याचे चित्र शुक्रवारी दि.५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मधील सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या कौतुका वरून दिसून येतेय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad