आर्णी(यवतमाळ) नागपुर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावर आर्णी जवळील दत्तरामपुर येथे दि.३१ डिसेंबर च्या सकाळी एक वाजता दरम्यान स्वीप्ट डिझायर ला अपघात झाल्याने त्यात एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दिनेश प्रभारकर राऊत असे मृतक चालकाचे नाव आहे.स्वीप्ट डिझायर क्रमांक एम.एच.४९ वी.७१९६ याला आर्णी येथील दत्तरामपुर जवळ अपघात झाल्याने गाडी पलटी झाली.विशेष म्हणजे मृतक चालक दिनेश राऊत हा जागीच ठार झाला असून ओंकार जयवंत काळमेघ हा गंभीर जखमी झाला असून घटनेतील दोघेही रा.गाजीपुरा,पोलीस स्टेशन लाडखेड असे आहेत.
