यवतमाळ: काही दिवसा पुर्वी पुसद येथील आणि तांड्यात जन्मलेले शिक्षक पंजाब चव्हाण यांनी 'याडी'नावाचा पुस्तक लिहिलयं.त्या पुस्तकांचं विश्लेशन यवतमाळ येथील जेष्ठ पत्रकार प्रा.न.मा.जोशी यांनी काही दिवसापुर्वी समाज माध्यमा सह एका वृत्तपत्रात केलं होतं.त्या अनुषंगाने जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी 'याडी' या पुस्तकाची दखल घेत लेखक तथा शिक्षक पंजाब चव्हाण यांचे कौतुक केलंय.
याडी या पुस्तकातून पंजाब चव्हाण यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यात तांड्यातील जिवन जगणाऱ्या आणि(याडी) आईने शिक्षणासाठी केलेली मदत,वडिलांनी दिलेली शाब्बासकी आणि त्या दरम्यान आलेल्या अडचणीचा सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. तांड्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्ती वर कादंबरी व्हावी अशी त्यांची कथा असताना त्यात लेखक पंजाब चव्हाण शाळेय जिवनात वावरताना आणि समोर आलेल्या संकटाला दोन हात करून जिद्द,चिकाटीने प्रस्थितीती सोबत केलेला अनुभव जशाचा तशा त्याने लिहिला आहे.
तीन भावांची पोटाची भूक भागविण्यासाठी आईला करावी लागणारी रोजमजूरी त्याच दरम्यान दुसऱ्या कडून भाकरीचं तुकड घेऊन पोटाच्या पिल्ल्यांना भरवणारी याडी म्हणजे आई यावर हा याडी नावाचा पुस्तक लिहिलं आहे.याची दखल खुद जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी घेतली.त्यामुळे शिक्षक पंजाब चव्हाण यांनी लिहिलेलं पुस्तक युवकांसमोर नवा आदर्श ठेवणारे असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response