या आधी ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच यासाठी शिक्षणाची अट नव्हती.मात्र आता शिक्षणाची अट बंधनकारक असल्याचे निवडणूक आयोगानी स्पष्ट केले आहे.
राज्यात एकुण १४ हजार २३४ गावात ग्रामपंचायत च्या निवडणूका होऊ घातल्या आहे.त्या पार्श्वभूमीवर नुकताच निवडणूक आयोगाने नव्याने आदेश काढल्याने निवडणूक लढविणाऱ्यांच्या डोक्यावर ताण वाढला आहे. १९७५ नंतर जन्म झालेल्या आणि निवडणूक लढवता असलेल्या उमेदवाराला किमान सातवी उत्तीर्णची अट नव्याने घालून देण्यात आली आहे.