गळफास घेण्या अगोदर त्याने स्वतःच्या बयान ची रेकॉर्डिंग व्हिडिओ करून सर्वसामान्य जनतेला दाखवित आत्महत्या करीत असल्याची माहिती समोर येतात लगेच पोलिस प्रशासनाने घटनास्थळावर जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला मरणाच्या दारातून बाहेर काढले.
यवतमाळ येथील नावाजलेल्या जगदंबा इंजिनीरिंग कॉलेज मध्ये असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य यांनी वारंवार मला मानसिक त्रास दिलेला आहे. त्यामुळे माझ्या घरी माझ्या काकाचा मृत्यू झाल्यानंतरही मला त्यांनी शोकास नोटीस दिल्याने व वारंवार त्रास दिल्याने माझे मानसिक संतुलन बिघडले असून याला जबाबदार इंजिनिअरिंग कॉलेजचे व्यवस्थापन आणि प्रशासन आहे. त्यामुळे सदर आत्महत्या करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले या महाविद्यालयांमध्ये कर्मचाऱ्याचे मानसिक शोषण केल्या जात असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चव्हाट्यावर येत होत्या त्यामुळे शेवटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याने हा वाद समोर आला.