यवतमाळ: सध्या अमरावती पदवीधर शिक्षक मतदार संघाची निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहेत.अशात आर्णी तालुक्यातील पांगरी या गावाच्या सून आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष तथा अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ.संगीता शिंदे यांचे पारडे सध्याच्या घडीला जड होत असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.
संगीता शिंदेंना करावी लागणार कसरत
निवडणूक म्हटलं की, यंत्रणा सज्ज पाहीजे.संगीता शिंदे यांच्या कडे तेवढी तगडी यंत्रणा नाही,शेवटच्या सर्व मतदान केंद्रा पर्यंत देखील जावू शकणार नाही.त्यामुळे नेमकं संगीता शिंदेचा फायदा आणि नुकसान कोणाला होईल हे दि.३ डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट होईलच. एकंदरीत संगीता शिंदे यांना निवडणूकीत मोठी कसरत करावी लागणार हे सुध्दा नाकारता येणार नाही.
गेल्या अनेक वर्षा पासून संगीता शिंदे ह्या शिक्षकांसाठी लढा देत आहे.शिक्षकांच्या न्याय हक्का साठी संगीता शिंदे यांनी थेट मंत्रालयात लक्षवेधी आंदोलन छेडलं होते.विशेष म्हणजे संगीता शिंदे ह्या माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या बहिण आहेत.बंधू कॅबिनेट मंत्री असता देखील शिंदेंनी शिक्षकांसाठी मंत्रालयात जोरदार आंदोलन करून विना अनुदानित शाळांना न्याय मिळवून दिला होता.त्या अनुषंगाने संगीता शिंदे यांच्या संदर्भात शिक्षक मतदार विचार करतील अशी चर्चा सुरू आहे.