घरा बाहेर पडताना मास्क, सोशल डिस्टन्स, हातांची नियमित स्वच्छता आदी दक्षता नियमांचे पालन करणे हेच कोरोना पासून मुक्ती मिळविण्यासाठी शस्त्र आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षतेचे पालन करून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केले.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोविड रूग्णांचा शोध घेणे,त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देत मृत्यूदर कमी करणे यासाठी "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" ही मोहीम राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.प्रतिबांधात्मक उपाययोजना,जनजागृती,प्रबोधन हाच परिणामकारक उपाय आहे व याद्वारे आपण जिल्हातील जनतेला सुरक्षित ठेवू शकतो. या मध्ये लोकसहभाग आवश्यक आहे.या अनुषंगाने मोहीम राबविण्यात येत आहे.नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सध्या ग्रामीण भागातील जनते कोरोना संदर्भात प्रचंड भीती असल्याचे समोर आले असून कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्या नंतर रूग्णांना उपचारासाठी भर्ती केल्या नंतर त्या बदल ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीती असल्याची माहिती आहे.त्यामुळे अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.शासन आणि प्रशासन तुमच्या साठीच काम करतेय त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तपासणी करिता स्वतःहून पुढे यावे जेणे करून जिल्हा लवकर कोरोना मुक्त होईल.
