Breaking

Post Top Ad

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

लॉट एन्ट्री न झालेला शेतमाल शेतक-यांना परत मिळणार-पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

लॉट एन्ट्री न झालेला शेतमाल शेतक-यांना परत मिळणार-पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा व दारव्हा खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या परंतु लॉट एन्ट्री न झालेल्या तसेच नाफेडने नाकारलेला शेतमाल आता संबंधित शेतक-यास संपूर्ण खर्च पकडून परत मिळणार आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री तसेच सहकार विभागाकडे नियमित पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

सन 2019 -2020 मध्ये उमरखेड केंद्रावरील हरभ-यांची तसेच पांढरकवडा व दारव्हा  खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या ज्या तुरीची लॉट एन्ट्री विहित कालावधीत होऊ शकली नाही, अशी एकूण 4035.12 क्विंटल तूर व 3748 क्विंटल हरभरा संबंधित तूर खरेदी केलेल्या संस्थेमार्फत सदर शेतक-यास परत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या कार्यवाहीमुळे लॉट एन्ट्री न झालेल्या या तुरीच्या हमीभावाने खरेदी व गोदामात साठवणूक करेपर्यंत झालेला सर्व अनुषंगिक खर्च (बारदाना, तोलाई, हमाली, वाहतूक खर्च व इतर ) संबंधित कर्तव्यात कसूर केलेल्या संस्थेस देण्यात येऊ नये. तसेच त्या संस्थेने या सर्व खर्चाची जबाबदारी घ्यावी. सदरची तूर वखार महामंडळाच्या गोदामातून संबंधित संस्थेस व संस्थेमार्फत शेतक-यांना परत करण्यासाठी होणारा संपूर्ण वाहतूक खर्च, हमाली व इतर खर्च देखील संबंधित संस्थेने करावा, अशा उपसचिव का.गो.वळवी यांनी दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीस संचालकास दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad