यवतमाळ: उमेद या महत्वाकांक्षी अभियानाचे खाजगीकरण होत असल्याने राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या कर्मचा-यांनी या विरोधात हजारोच्या संख्येत यवतमाळ येथील आझाद मैदानावरून मुकमोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात जिल्ह्याभरातुन किमान १० हजार महिला सहभागी झाल्याचे आयोजकाकडुन सांगण्यात आले.
सकाळपासुनच महिलांची आझाद मैदानाकडे कुच
भर उन्हात उमेदच्या कर्मचा-यांची धाव आझाद मैदानाकडे दिसुन आली. प्रवेश द्वारावर प्रत्येकांच्या हातावर सॅनिटायझर फवारल्या जात होते. भर उन्हात महिला हजारोंच्या संख्येने अवघ्या काही तासातच जमल्या होत्या. दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास महिलांचे येणे सुरूच होते. दरम्यान भर उन्हात पावसासाठी आणलेल्या छत्र्या या महिलांच्या कामी पडल्या. छत्र्या घेवून महिला आपल्या जागेवर बसुन मोर्चा कधी निघते याची प्रतिक्षा करीत होत्या. गाण्याद्वारे यावेळी प्रबोधन करण्यात येत होते.
२ लाख ५० हजार २२२ कुटुंबातील महिला या अभियानात झोकल्या गेल्या आहे. 2 लाख कुटूंबियाचे सामाजिक समावेश करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व समुह संसाधन व्यक्ती व कर्मचारी पार पाडत आहे. मात्र कोणतीही पुर्व सुचना न देता अचानक जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदावर कार्यरत कर्मचारी यांच्या सेवा शासनाने अन्यायकारक पध्दतीने समाप्त केल्या. खाजगीकरण होत असल्याने महिला कर्मचा-यांनी आज रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या प्रशासनासमोर सादर केल्या. मोर्चाचे नेर्तृत्व महेश पवार, मनिषा काटे आदिंनी केले. या मोर्चाला आयटक संघटनेनेहि आपला पाठिंबा जाहिर केला असल्याचे दिवाकर नागपुरे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response