यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग आज पुन्हा मंदावत असल्याचे चित्र असून रविवारी गत २४ तासात ३६ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ३३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत ८०८३१ नमुने पाठविले असून यापैकी ७९८२८ प्राप्त तर १००३ अप्राप्त आहेत. तसेच ७०७३९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत ५८८ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' असून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ९०८९ झाली आहे. रविवारी ३३ जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८१३७ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ मृत्युची नोंद आहे.