घटनेतील आरोपी नामे पृथ्वी मनोहर राठोड वय २२ वर्ष असे आहे एका १७ वर्षांच्या बालिकेवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले असून अल्पवयीन पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून आर्णी पोलीसांनी कलम ३७६(२) (एन) ५०६ भादवी सह कलम ४ (६) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीला दुकानात जाता आणि येता वेळी आरोपी पृथ्वी राठोड हा ओळख करून त्यांचे रूपांतर मैत्रीत केले.तद्नंतर पिडीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून प्रेमात पाडले.आरोपी हा सतत त्या पिडीत अल्पवयीन मुलीला स्वतःच्या घरी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.शारीरिक संबंध संदर्भात कोणाला सांगितले तर तुला जिवाने ठार मारण्याची धमकी देत अनेक दिवस शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याची माहिती पिडीत अल्पवयीन मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुनद केले आहे.
