Breaking

Post Top Ad

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

महागांव मध्ये अपघातात एक जण ठार

महागांव मध्ये अपघातात एक जण ठार
महागांव(यवतमाळ) येथील राष्ट्रीय महामार्गावरील महागांव नजिक असलेल्या खडका फाटा उडाण पुलावर 

सकाळी साडे नऊ वाजता दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जबरदस्त धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.ट्रक क्रमांक डी.एल.७ जी.सी.३७६५ याने दुचाकी क्रमांक एम.एच.बी.के.४२८३ ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी अक्षरशः ट्रक खाली गेली.

मृतक खुशाल गब्बा जाधव रा.माळवागद असे अपघातात जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.हा अपघात सकाळी साडे नऊ वाजता दरम्यान नागपुर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील खडका फाटा जवळील उडाण पुलावर झाला.हा अपघात एवढा जबरदस्त होता की, दुचाकी ला ट्रकने फरफकट नेल्याने दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला.

दरम्यान उमरखेड वरून या यवतमाळ च्या दिशेने जात असलेल्या उमरखेड उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी घटनास्थळी थांबा घेऊन तात्काळ पोलीस व आरोग्य विभागाला या संदर्भात सूचना देऊन यंत्रणा पाचारण केली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चालकास ताब्यात घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad