बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा फटका राज्यासह यवतमाळ जिल्हाला बसत आहे.घाटंजी तालुक्यातील वघारा टाकळी येथे वीज पडून १० शेळ्यांचा आणि एका कालवडीचा जागीच मृत्यू झाला आहे .तर मंदिरावर वीज पडून मंदिराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे .सुदैवाने या मंदिरात कोणीही नसल्याने जिवीतहानी टळली आहे
यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसाने आर्णी आणि घाटंजी तालुक्यात जोरदार हजेरी लावली.आर्णी तालुक्यातील आयता येथे वीज पडून शेतात काम करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे . तर तिघे जखमी झाले आहेत . जखमींना सावळी सदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.घाटंजी तालुक्यातील वघारा टाकळी येथे वीज पडल्याने दहा शेळ्या जागीच ठार झाल्या असून मंदिरा सुध्दा वीज पडली.त्यामुळे मंदिराच्या कळसाला छिद्र पडले आहे.

