आज सायंकाळच्या वेळेला पावसाने जोरदार हजेरी लावली, दरम्यान वीजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होता.
आर्णी तालुक्यातील 'आयता'या गावी काही मजूर शेतात सोयाबीन काढत होते. पाऊस सुरू असल्याने मजूरांनी स्वत:वर ताडपत्री ओढून घेतली. परंतु तेजस नागोराव मेश्राम ( १८ ) याने थोड्या वेळाने ताडपत्री बाहेर डोकावून पाहिले असता त्याच क्षणी वीजेने त्याला ओढून घेतले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले त्यापैकी दोघांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. क्रिष्णा सिताराम मेश्राम आणि सूर्यकांत दत्ता पेंदोरे असे जखमी झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत
