Breaking

Post Top Ad

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

जिल्ह्यात मृत्यूचा तांडव सुरूच: १३८ जण पुन्हा पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात मृत्यूचा तांडव सुरूच: १३८ जण पुन्हा पाॅझिटिव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असून मृत्युंची संख्यासुध्दा वाढत चालली आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आज दि. ५ रोजी शनिवारी जिल्ह्यातील सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला तर नव्याने १३८ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १०२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


शनिवारी दिवसभरात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ५४ वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ५८ वर्षीय पुरुष व दिग्रस तालुक्यातील ६० आणि ४७ वर्षीय पुरुष, उमरखेड शहरातील ५३ वर्षीय पुरुष, वणी शहरातील ६० वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील ४७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १३८ जणांमध्ये  पुरुष ७७ आणि  महिला ६१ आहेत. 


यात दिग्रस शहरातील तीन पुरुष व तीन महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील २० पुरुष व १४ महिला, पुसद शहरातील १० पुरुष व १६ महिला, पुसद तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, वणी शहरातील १७ पुरुष व आठ महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील आठ पुरुष व सात महिला, घाटंजी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे.


सद्यस्थितीत जिल्ह्यात ७४१ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २६५ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४०६३ झाली आहे. यापैकी २९४१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ११५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २३० जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad