Breaking

Post Top Ad

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

नविन २०२ पॉझिटीव्ह तर २०५ जणांना सुट्टी

नविन २०२ पॉझिटीव्ह तर २०५ जणांना सुट्टी

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले २०५ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत गेल्या दोन दिवसा नंतर जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात दोन दिवसांत २०२ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यात दि.१ सप्टेंबर रोजी १०७ जण पॉझिटीव्ह तर दि. २ सप्टेंबर रोजी ९५  जण पॉझिटीव्ह आले आहेत.

गेल्या दोन दिवसांत मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील ८५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला आणि ४६ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ३२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील ४७ वर्षीय महिला, नेर शहरातील ७० वर्षीय व ६४ वर्षीय पुरुष आणि घाटंजी तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दि.१ सप्टेंबर रोजी पॉझिटीव्ह आलेल्या १०७ जणा मध्ये  पुरुष ७२ आणि ३५ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ३२ पुरुष व १७ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील एक पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, महागाव शहरातील १३ पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, पुसद शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, आर्णी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, अमरावती येथील एक पुरुष, अकोला येथील एक महिलेचा समावेश आहे.

आज दि.२ सप्टेंबर ला पॉझिटीव्ह आलेल्या ९६ जणांमध्ये पुरुष ६३ व ३२ महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील 18 पुरुष व आठ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, बाभूळगाव शहरातील सात पुरुष व एक महिला, नेर शहरातील एक पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील दोन पुरुष, उमरखेड तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील १० पुरुष व सात महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील पाच पुरुष व चार महिला, वणी शहरातील तीन पुरुष व सहा महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad