Breaking

Post Top Ad

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

"आपला यवतमाळ दुसऱ्या क्रमांकावर"

"आपला यवतमाळ दुसऱ्या क्रमांकावर"

यवतमाळ : कोरोनाच्या संकटात नागरिकांना असलेली लक्षणे आणि त्याची त्वरीत चाचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर उपचारासाठी वेळ मिळतो व त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत होते. त्यामुळेच जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यांनी भर दिला असून जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्याचीच फलश्रृती म्हणजे प्रत्येक दिवशी लॅबमध्ये होणाऱ्या  चाचण्यांच्या संख्येत यवतमाळ जिल्हा द्वितीय क्रमांकावर आहे.


"जिल्हाधिकारी उत्तम पणे जबाबदारी पार पाडत आहेत"

दि.१२ मार्च पासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला. सुरवातीला येथील रुग्णांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. जसजशी रुग्णांची संख्या वाढत गेली. तसे नमुन्यांची संख्यासुध्दा वाढण्यात आली. त्यामुळे नागपूरवरून रिपोर्ट प्राप्त होण्यास बराच कालावधी लागत होता. या दरम्यान पॉझिटीव्ह असलेला व्यक्ती इतरांच्या संपर्कात येत असल्यामुळे रुग्णांची संख्या न कळत झपाट्याने वाढत गेली. मात्र रिपोर्ट येईपर्यंत संबंधित पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील अतिजोखीम व कमीजोखीम व्यक्तींचे नमुने घेण्यास प्रशासनाची अडचण जात होते. त्या अनुषंगाने अडचणी लक्षात घेऊन पालकमंत्री यांच्या पुढाकाराने व प्रशासनाच्या नियमित पाठपुराव्यामुळे यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साडे तीन कोटी रुपये खर्च करून विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरू करण्यात आले. त्यामुळे यवतमाळ येथील रुग्णांचे व त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या नमुन्यांची चाचणी अहोरात्र येथे सुरु आहे. याशिवाय बुलडाणा व वाशिम येथील रुग्णांचेसुध्दा नमुने यवतमाळच्या प्रयोगशाळेत तपासणी केल्या जात आहे. पहिल्या दिवसांपासून आतापर्यंत यवतमाळ येथील प्रयोगशाळेत एकूण पन्नास हजार २६२ नमुने पाठविले असून यापैकी तीस हजार ४३८ नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. उर्वरीत १९८२४ रॅपीड ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे नमुने तपासण्यात आले आहेत. दि.३१ ऑगस्टपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील २२ हजार ६२४ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.

'तालुका नुसार आकडेवारी'

यवतमाळ तालुका (२६५५ नमुने) असून, एक हजारांपेक्षा जास्त नमुने पांढरकवडा तालुका ( २२६४ नमुने), पुसद तालुका (२०३६ नमुने), दिग्रस तालुका (१९४६ नमुने), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१६७३ नमुने), घाटंजी तालुका (१४६३ नमुने), राळेगाव तालुका (१४३२ नमुने), वणी तालुका (१२९५ नमुने), उमरखेड तालुका (११७० नमुने), महागाव तालुका (११०६ नमुने), कळंब तालुका  (११०२ नमुने), बाभुळगाव तालुका (१०६० नमुने) आहे.

एका दिवसात तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या २१ ऑगस्ट रोजी ६१६ नमुने, २२ ऑगस्ट रोजी ७२६ नमुने, २३ ऑगस्ट ४६१ नमुने, २४ ऑगस्ट ५५८ नमुने, २५ ऑगस्ट ६१२ नमुने, २६ ऑगस्ट ६८६ नमुने, २७ ऑगस्ट ५६० नमुने, २८ ऑगस्ट ७५२ नमुने, २९ ऑगस्ट ७९५ नमुने, ३० ऑगस्ट ६५६ नमुने आणि ३१ ऑगस्ट रोजी ८५३ नमुने आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्याने जास्तीत जास्त नमुने पाठवावे, अशी सुचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad