Breaking

Post Top Ad

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

'जिल्हाधिकारी सिंह रात्री एकटेच सायकलने गस्त घालतात तेव्हा'....

'जिल्हाधिकारी सिंह रात्री एकटेच सायकलने गस्त घालतात तेव्हा'....

कोविड सेंटर ला भेट देताना जिल्हाधिकारी

'यवतमाळात सिंहाची सायकलने गस्त'

सध्या राज्यासह जिल्ह्यात 'कोरोना'चा मोठा उद्रेक सुरू असताना जीवाची पर्वा न बाळगता रात्री बे रात्री सर्व सुरक्षा बाजूला ठेवून यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंन्द्र सिंह यांनी बुधवारी रात्री सायकलने घराच्या बाहेर पडून शहरातील नागरिक कसे वागतात, कोविड सेंटर मध्ये डाॅक्टर,नर्स रूग्णांना योग्य सोईसुविधा देतातय की, नाही यांची गोपनीय पध्दतीने स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्याने प्रशासनातील अधिकारी सह नागरिकांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांचे धाबे दणाणले असल्याची माहिती पुढे आली आहे.


आर्णी रोड वरील बस स्थानकातील प्रवाशांची संवाद साधतांना जिल्हाधिकारी सिंह

खर तर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह रात्री साडे नऊ वाजता दरम्यान एकटेच घरा बाहेर पडले.यात त्यांनी कुठेही सुरक्षा किंवा शासकीय गाडीचा वापर न करता थेट सायकलने शहरातील विविध भागाची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने नऊ वाजून ५० मिनिटांनी कोविड सेंटर ला भेट देऊन ऑक्सिजन ची पाहणी केली. काही तासा आधीच पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोविड सेंटर मधील डाॅक्टरांची कमतरता, व्हेंटिलेटरचा अभावमुळे त्याला जीव गमवावा लागला. शहरासह जिल्हात आणखी कोणी दुसरा "पांडुरंगाचा" जीव जावू नये याची पुर्ण काळजी सध्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह घेतांनी दिसताय.


जिल्हाधिकारी या आधी सुध्दा दोन वेळा कोविड सेंटर मध्ये जावून रूगांची संवाद साधून तेथिल मिळवणाऱ्या सोईसुविधा बाबत माहिती घेतली आहे.असे असताना जिल्हाधिकारी सिंह सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून नागरिकांसाठी रात्री बे रात्री एकटेच घरा बाहेर पडून कोविड सेंटर सह बस स्थानक मधिल प्रवाशांची ते उघडपणे संवाद साधतात हे नक्कीच नागरिकांना धीर देणारा विषय मानल्या जात आहे. जिल्हाधिकारी सिंह यांनी स्वतः सायकलने केलेला दौरा नागरिकांना धीर देणार असला तरी प्रशासनातील कर्तव्य चोख पणे न बाजावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या साठी धक्का देणारा आहे. जिल्हाधिकारी केव्हा आणि कधी कुठे जाईल यांचा नेम राहिलेला नाही, त्यामुळे कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांनी सावध राहण्याची गरज आहे.

1 टिप्पणी:

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad