किशोर तिवारींनी व्हाॅट्सअप वर पाठवलेला मेसेज
'वसंतराव नाईक शेतकरी मिशन'चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी समाज माध्यमांवर पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी भेटी चा व्हिडिओ टाकुन त्याच सोबत काॅग्रेसचे देवानंद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मेसेज स्वतः तिवारींनी पाठवले आहे.दि.२५ सप्टेंबर ला किशोर तिवारींनी पांढरकवडा तालुक्यातील साखरा या गावातील शेतकरी महिलेची भेट घेतली.दरम्यान त्यावेळी तिवारींनी महिलेला येथे देवानंद पवार आले होते का अशा प्रश्न विचारत असलेला व्हिडिओ व्हायरल केला आहे.
किशोर तिवारींना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे.असे असताना स्वतःचे कर्तव्य बजावण्या ऐवजी दुसऱ्या वर टिका टिपणी करण्यात वेळ घालवत आहे.विशेष म्हणजे दि.५ सप्टेंबर रोजी किशोर तिवारींना नगरसेवक संतोष बोरेले यांनी चांगलाच चोप दिल्याची कबुली खुद संतोष बोरेले यांनी एका व्हिडिओ च्या माध्यमातून दिली आहे.तेव्हा पासून तिवारी यांचा मानसिक दृष्ट्या अस्थीर झाल्याची चर्चा आहे.
किशोर तिवारांनी देवानंद पवार संदर्भात समाज माध्यमांवर पाठवलेल्या मेसेज बदल विचारणा केली असता,पवार म्हणाले की, किशोर तिवारींवर 'रट्टे' पडल्या पासून त्यांचा मानसिक संतूलन बिघडला असून त्यांना माणसांच्या औषधी ऐवजी कुत्र्यांची 'इंजेक्शन'ची आवश्यकता असल्याची बोचरी टिका पवार यांनी केली आहे.देवानंद पवार यांनी तिवारीं बदल पुढे बोलण्यास नकार दिला.या संदर्भात तिवारींना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांचा फोन नाॅट रिचेबल येत असल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.सध्या तिवारींचा पद धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

