Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

पाच जणांचा मृत्यू: ७६ जण पाॅझिटिव्ह

पाच जणांचा मृत्यू: ७६ जण पाॅझिटिव्ह
यवतमाळ : जिल्ह्यात दि.२५ सप्टेंबर रोज शुक्रवार ला पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून नव्याने ७६ जण पॉझिटीव्ह आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील  दोन पुरुष, राळेगाव शहरातील ४६ वर्षीय पुरुष, पुसद शहरातील ६५ वर्षीय महिला, वणी शहरातील ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ७६ जणांमध्ये ४६ पुरुष व ३० महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील २८ पुरुष व १३ महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व आठ महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील एक पुरुष, घाटंजी तालुक्यातील एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व तीन महिला, वणी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुषाचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ६११ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ६७८ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७९२१ झाली आहे. यापैकी ६३८७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २४४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २९४ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad