एका पंचवीस वर्षीय तरूणीवर एक-दोघे नव्हे तर तब्बल १३९ जणांनी बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप पिडीत तरूणीने केल्याची माहिती पुढे आली आहे. हैदराबाद येथील २५ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी ४२ पानांचा एफआयआर दाखल केला आहे.
पिडीत तरूणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी ४२ पानांचा एफआयआर दाखल केला असून दरम्यान यात अनेक राजकीय नेते आणि त्यांचे पीए सह वकील, पत्रकार, व्यावसायिक तसचे इतरांचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षा पासून आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा तरूणीचा दावा आहे. विशेष म्हणजे हे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
पिडीत तरूणीने दिलेल्या माहितीनुसार २००९ मध्ये त्यांचा लग्न झाला होता. लग्नानंतर एकाच वर्षात तिचा घटस्फोट झाला. त्या दरम्यान २० जणांनी पिडीत तरूणीवर लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेत कुटुंबातील काही सदस्य सुध्दा सहभागी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पिडीत तरूणीने चे घटस्फोट झाल्या नंतर 'ती' पुढील शिक्षण घेण्यासाठी आई-वडिलांकडे गेले असता तिथेही अनेकांनी लैंगिक अत्याचार केले.तसेच पोलीसांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने भीतीपोटी या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यास उशीर झाल्याचे तरूणींच म्हणणं आहे. तरूणीने पोलिसात तक्रार दिल्या नंतर तपास सुरू असून अनेक मोठे राजकीय नेत्यांची नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे.