![]() |
बाजारपेठेत वाहनाने जातांना पालकमंत्री |
'राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या घरी बाप्पाचे आगमण'
राज्यासह देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाते.मात्र या वर्षा संपूर्ण जगात 'कोरोना'चे संकट असताना देखील गणेशोत्सव साजरा केल्या जात असल्याचे चित्र आहेत. दरम्यान राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या घरी 'विघ्नहर्ता' गणरायाची प्रतिष्ठापना स्थापना करण्यात आली.
![]() |
श्रीगणेशाची मुर्ती घरी आणताना |
साडे अकरा वाजता च्या सुमारास स्वतः पालकमंत्री संजय राठोड वाहन चालवत बाजारपेठेत परिवारा सोबत दाखल झाले. विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्र्यांच्या तोंडाला मास्क लावून बाप्पाची मुर्तीची घेतली. यावेळी त्याच्या सोबत त्यांच्या पत्नी, मुलगी आणि मुलगा सुध्दा हजर होते.
भीतीचे सावट. नैराश्याची काळजी.. उदासीनतेची छटा.. गेले काही महिने अशा दडपणाखाली दिवस ढकलणाऱ्या मनांना उभारी देणारे गणेशोत्सवाचे चैतन्यपर्व शनिवार पासून सुरू होत आहे. शनिवारी सकाळ पासून सगळीकडे गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. 'विघ्नहर्ता' गणराया राज्यासह जिल्हातील नागरिकांची चिंता,दुःख, कोरोना संकट प्रापंचिक विवंचना दूर करो आणि सर्वांना आनंदी ठेवो अशी प्रार्थना राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी श्रीगणेशाच्या चरणी केली. वनमंत्री राठोड यांच्या घरी अनेक वर्षा पासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. कोरोना च्या संकटात सुध्दा ती परंपरा सुरू ठेवली आहे.
![]() |
पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी स्थापित गणराया ची पहिली आरती करण्याचा मान पत्रकार विवेक गांवडे यांना देण्यात आला.यावेळी इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि प्रिंट मिडीयाचे पत्रकार बांधव हजर होते. |