Breaking

Post Top Ad

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

४२ जण आऊट तर ५५ जण इन


४२ जण आऊट तर ५५ जण इन
यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ४२ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५५ पॉझिटीव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

सध्या जगासह देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असतांना या मध्येच आज दि.२२ ऑगस्ट रोजी बाप्पांचे घरोघरी स्थापना करण्यात आली.तर दुसरी कडे बाप्पांचा आगमण होण्या पुर्वी दोन दिवसा पासून जिल्हातील कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने घट होतांना दिसत आहे.

आज शनिवार  नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ५५ जणांपैकी ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, आर्णी शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील एक महिला व वणी येथील दोन महिला व एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील नागोबा मंदीर येथील एक पुरुष, पुसद शहरातील दोन महिला, पुसद शहरातील गायमुख नगर येथील दोन पुरुष, स्टेट बँक चौक येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील जाम बाजार येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील चार पुरुष व तीन महिला, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, तलावफैल येथील एक पुरुष, सिव्हील लाईन पिस्ता शॉप येथील दोन पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन महिला व एक पुरुष, वंजारी फैल येथील एक पुरुष, यवतमाळ येथील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील मोझर येथील दोन महिला व एक पुरुष, झरी शहरातील मुकुटबन येथील आरसीसीपीसी कंपनीतील चार पुरुष, मानोरा ग्रामीण पांचाळा येथील एक महिला आणि दारव्हा शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी १५० नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४०८५२ नमुने पाठविले असून यापैकी ३९९९४ प्राप्त तर ८५८ अप्राप्त आहेत. तसेच  ३७४१७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १९६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २५७७ झाली आहे. यापैकी १७०६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६३ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५५ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad