अंग्विल्ला या देशातील अस्मारा शहर |
Post Top Ad
रविवार, २३ ऑगस्ट, २०२०
'कोरोनाला या देशात नो एण्ट्री'
भारतातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती भक्कम असल्याने नागरिकांना कोरोना होणार नाही, असे सुरूवातीला म्हटल्या गेलं. काही दिवस देशात कडक लाॅकडाऊन सुध्दा लावण्यात आला. तद्नंतर ऑनलाॅक सुरू ठेवत काही नियमात सुटत देत हळूहळू सर्वच क्षेत्रातील व्यवसायिकांना संधी देत कोरोनाच्या काळात ही ठप्प झालेला व्यवहार सुरू करण्यात आला.
'प्रगतीशील देशातील मृतकांचा आकडा'
अमेरिकेत मृत्यू झालेले रूग्ण १८०१७४ ब्राझील मध्ये एकुण मृत्यू झालेले रूग्ण ११४२७७ भारतात आता पर्यंत ५६८४६ तर रशिया मध्ये १६३१० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जेव्हा भारतात आणि राज्यात कोरोनाचे बोटांवर मोजण्याइतके रूग्ण असताना कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्या नंतर सर्व नियमात सुट्ट देण्यात आली.परिणामी आज देशात तीस लाखापेक्षा जास्त रूग्णांना कोरोना झाल्याची आकडेवारी जगाच्या नकाशावर दिसत आहे. सुरूवातीला सातासमुद्रापार गेलेल्या लोकांना व्हि.आय.पी. सुविधा देत त्यांना देशात परत आणण्यात आलं. तर दुसरी कडे दोनवेळेच पोट भरण्यासाठी या राज्यातून दुसऱ्या राज्यात मोलमजुरी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उपाशी पोटी मरावं लागल तर काहींना पायी चालता चालता रेल्वे रूळार झोप लागल्याने रेल्वेच्या अपघातात जीव गमवावा लागला. मात्र त्या कडे सरकारने लक्ष दिले नाही. सर्वांत जास्त बळी हा सामान्य नागरिकांचा यामध्ये जात आहे.
"या देशात कोरोना मुळे एकाही रूग्णांचा मृत्यू नाही"
देशासह जगात कोरोना ने उद्रेक केला असताना काही देशात कोरोना मुळे एकही जणांचा मृत्यू झालेला नाही असे अनेक देश आहेत. यामध्ये फारो स्लॅमड्स, इरिट्रिया, मंगोलिया, कंबोडिया, भूतान, सेशल्स, मकाओ, तिमोर वेस्ट, डोमिनिका, एमएस झॅमोम या देशात मृत्यू चा प्रमाण शुन्य आहे. अंग्विल्ला या देशात केवळ तीन रूग्ण असून एकाचा ही कोरोना मुळे मृत्यू झालेला नाही.
'या देशात कोरोनाने घेतली माघार'
ज्या देशाने कोरोना जगाला आदंण म्हणुन दिला त्यात देशात सध्याच्या घडीला सर्व सुरळीत आहे. रूग्ण आढळण्याचे प्रमाण देखील समोर येत नाही आहे. मात्र फारो स्लॅमड्स, इरिट्रिया, मंगोलिया, कंबोडिया, भूतान, सेशल्स, मकाओ, तिमोर वेस्ट, डोमिनिका, एमएस झॅमोम आणि अंग्विल्ला या देशात कोरोना ने दोन अंकी आकडा सुध्दा गाठला नाही. विशेष म्हणजे वरिल देशात मृत्यू चा प्रमाण शुन्य वर आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response