यवतमाळ : जिल्ह्यात आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ९७ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात गत २४ तासात ४३ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला.
मृत झालेली व्यक्ती (पुरुष / वय ६२) पुसद येथील असून ते २० ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित मृतांचा आकडा एकूण ६४ झाला आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ४३ जणांमध्ये २२ पुरुष आणि २१ महिला आहेत. यात दारव्हा शहरातील दोन पुरुष, यवतमाळ शहराच्या विविध भागातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील सात पुरुष व चार महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक महिला, पुसद शहराच्या विविध भागातील चार पुरुष व दोन महिला, आर्णि शहराच्या विविध भागातील दोन पुरुष, वणी शहराच्या विविध भागातील एक पुरुष व दोन महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील चार महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व तीन महिला पॉझिटीव्ह आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी १७४ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४२१३८ नमुने पाठविले असून यापैकी ४०८७५ प्राप्त तर १२६३ अप्राप्त आहेत. तसेच ३८२५५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ५४६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १९७ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २६२० झाली आहे. यापैकी १८०३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १६८ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response