Breaking

Post Top Ad

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

दुचाकीला अपघात आई सह बाळ गंभीर जखमी


'दुचाकीला अपघात आई सह बाळ गंभीर जखमी'
आर्णी येथील काम करून घरा कडे निघालेल्या दुचाकीला आर्णी जवळील मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृध्दाश्रमा जवळ कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला.त्यात चार महिन्याच्या बाळा  सह आई गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता दरम्यान घडली.

दुचाकीवर बिनधास्त प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्रवास करत असताना आपल्या सोबत चार महिन्याचा बाळ आहे याची साधी काळजी सुध्दा वाहन चालक तथा त्या बाळाचे वडील यांना नसावी. पावसाळ्याच्या दिवसात चार महिन्याच्या बाळाला सोबत घेवून दुचाकीने प्रवास करतात हे नवल वाटण्यासारखे आहे.

अंदाजे ५० ते ६० च्या स्पिडने घरा कडे निघालेल्या दुचाकी समोर अचानक कुत्रा आडवा येतो आणि तिघेही भर रस्त्यावर पडतात. ये-जा करणारी व्यक्ती जखमींना मदत करून तातडीने उपचारासाठी नजिकच्या रूग्णालयात दाखल करतात. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव नहीरा सचिन कोयरे रा.कुऱ्हा तळणी असे आहे. महिलेला डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागला असून चार महिन्याच्या बाळाला  डोक्याला व काना जवळ मार लागला आहे.

चार महिन्याचा बाळ असल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, चालक, महिला आणि बाळ तिघे कोलांटी खात वेगवेगळ्या जागी पडले. मात्र बाळाच्या आईने जिवाची परवा न करता खाली पडलेल्या बाळाला उचलून जवळ घेतले. त्या नंतर उमरी येथील एका युवकांने त्यांना मदत करित रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad