Breaking

Post Top Ad

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

जिल्हाची वाटचाल लवकरच कोरोना मुक्त कडे

जिल्हाची वाटचाल लवकरच कोरोना मुक्त कडे
कोरोनामुक्तांच्या तुलनेत प्लाझ्मा दान कमीच

'प्रशासनाच्या कामगिरीपुढे कोरोना हरणार'

चायना लोकांनी जगाला आदंण म्हणुन कोरोना हा संसर्ग साथरोग नावाचा आजार दिला असला तरी "आम्ही कोरोनामुक्त जिल्हा करणार असा विश्वास जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, अधिष्ठाता डाॅ.राजेश प्रताप सिंह आणि डाॅ.मिलिंद कांबळे यांनी केला आहे". काही दिवसा आधी एका शेठजीच्या चेल्याला कोरोना झाला होता. तद्नंतर "त्या" चेल्याला उपचारासाठी रूग्णालयात भर्ती करण्यात आले होते. मात्र कायम चर्चेत राहण्याची सवय असल्याने आणि 'शेठजी'च्या सांगण्यावरुन गडीने नको ते आरोप केले.

आरोग्य यंत्रणा अतीशय जवाबदारीने कामगिरी करताय हे जिल्हाधिकारी सिंह यांना माहित होते. तरी सुध्दा त्यांनी तब्बल दोन वेळा कोविड सेंटर मध्ये जावून रूग्णांची विचार पुस करून रूग्णालयात जेवन, औषधी, ऑक्सिजन आणि डाॅक्टर हे रूग्णांना चांगली वागणूक देतात की, नाही यांची माहिती थेट कोरोना रुग्णांच्या तोंडी ऐकुन घेतलं. ज्या कोरोना रूग्णांनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर आरोप केल्या नंतर तो रूग्ण काही दिवसांनी 'पाॅझिटिव्ह चा निगेटीव्ह' झाल्या नंतर त्यांनी केलेले आरोप मागे घेत डाॅक्टर आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले. मात्र काही बुद्धीजीवी लोकांनी याला वेगळवण देत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी जिल्हा प्रशासनावर केलेल्या आरोपा कडे स्पेशल दुर्लक्ष केल्याने राजकारण करणाऱ्यांना मोठा धक्का बसला.

तुमच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त करून दाखवणार
एम.डी.सिंह, जिल्हाधिकारी
जिल्हातील तमाम नागरिकांनी कोरोनाला आजिबात घाबरू नये, मात्र निष्काळजीपणे पण राहू नका. शासन आणि प्रशासनाने दिलेल्या नियमाचे नागरिचांनी काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाला हार मानावी लागेल यासाठी नागरिकांचे सहकार्य प्रशासनाला असणे तेवढेच गरजेचे आहे. कोरोना हा आजार हवेतून पसरतो त्यामुळे तोंडाला मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे,हात वारंवार स्वच्छ करणे असे नियम नागरिकांनी स्वतःहून पाळल्यास कोरोनाला हार मानावी लागेल आणि जिल्हा कोरोना मुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. एम.डी.सिंह, जिल्हाधिकारी 


कोरोनामुक्तांच्या प्रमाणात प्लाझ्मा दान कमी; डाॅ.राजेश प्रताप सिंह, अधिष्ठाता
डाॅ.राजेश प्रताप सिंह
कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींच्या प्लाझ्मामध्ये अॅन्टीबाॅडीज तयार झालेल्या असतात.या अॅन्टीबाॅडीजचा उपयोग कोरोना वरील उपचारांमध्ये होतो.त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्याची गरज आहे. प्लाझ्मा दानानंतर अॅन्टीबाॅडीजचे प्रमाण अधिक वाढते. आपल्याकडे कोरोना मुक्त  झालेल्यांचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात आहे. पण आता पर्यंत केवळ आठ जणांनी प्लाझ्मा दान केलंय. रक्तांमध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स असतात आणि रक्तातील द्रवरूप पदार्थ म्हणजे प्लाझ्मा असतो. प्लाझ्माचा रंग पिवळसर असतो. रक्तांच्या गुठळ्या करण्याचे काम करत असतो.

प्रश्न:- कोरोना रूगाला प्लाझ्माचा कसा उपयोग होतो?
उत्तर:- कोरोना रूग्ण बरा होतो तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोनाच्या विरोधात अॅन्टीबाॅडीज तयार होतात.या अॅन्टीबाॅडीज प्लाझ्मामध्ये असतात.म्हणुन रूग्ण बरा होतो. यशस्वी उपचारा नंतर २८ दिवसांनी त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील तर ती व्यक्ती प्लाझ्माचे दान करू शकते. प्लाझ्मा मुळे कोरोना रूग्णावरील उपचारांमध्ये फायदा होतो.

प्रश्न:-प्लाझ्मा कितीवेळा दान करता येते? 
उत्तर:-कोरोना रूग्ण बरा झाल्या नंतर २८ दिवसांनी त्याला प्लाझ्मा दान करता येते. पंधरा दिवसांच्या अंतरावर केवळ दोन वेळा प्लाझ्मा दान करता येते. कोरोनातून बरा झालेल्या व्यक्तीचाच प्लाझ्मा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कामी येते.

प्रश्न:- कोरोना मुक्त झालेली व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येते का?
उत्तर:- आता पर्यंत हजारो रूग्णांनी कोरोना वर मात केली.मात्र प्लाझ्मा दान केवळ आठ बरे झालेल्या रूग्णांनी केलं. आम्ही स्वतःहून कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी फोन करतोय मात्र पाहिजे तसा प्रतिसाद बरे झालेल्या कोरोना रूग्णांकडून मिळत नाही. अंदाजे एक हजार ४३० कोरोना रूग्ण बरे झाले. बरे झालेल्या सर्व रूग्णांनी प्लाझ्मा दान केल्यास उपचार घेणारे रूग्ण लवकर बरे होतील आणि जिल्हा कोरोना मुक्त झाल्या शिवाय राहणार नाही.

"मी डाॅक्टरांच्या उपचारांमुळे वाचलो"
संजय वर्मा
मी रूग्णालयात उपचार घेत असताना पुर्ण खचलो होतो.मात्र मला धीर आणि माझ्या वर योग्यरित्या उपचार केल्याने मी लेकरा-बाळात पुन्हा जाऊ शकलो. डाॅक्टर, नर्स आणि सफाई कामगार हे लोक दिवस-रात्र रूग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न करताय त्यांच्या प्रयत्नामुळे मी बरा होऊ शकलो
संजय वर्मा,बरा झालेला रूग्ण 

"आम्ही कोणत्याच रूग्णा सोबत भेदभाव करित नाही"
डाॅ.मिलिंद कांबळे
उपचारासाठी भर्ती असलेल्या रूग्णांसोबत रूग्णालयात भेदभाव केल्या जात नाही. औषधी, गोळ्या वेळेनुसार  कमी जास्त करावा लागतो. त्यामुळे काही रूग्णांचा गैरसमज होत असेल मात्र आम्ही रूग्णां ची पुर्ण काळजी घेऊन त्यांना वेळेवर जेवन, औषधी आणि ऑक्सिजन देण्यास कुठलाही विलंब लावत नाही.
डाॅ.मिलिंद कांबळे, कोरोना समन्वयक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad